Most chicken Nuggets Eaten in one Minute: ज्या लोकांना चिकन खायला खूप आवडतं आणि त्यांच्यासमोर चिकननं भरलेली प्लेट ठेवण्यात आली. तसेच या प्लेटमध्ये ठेवलेलं चिकन खाण्यासाठी त्यांना एक मिनिटाचा कालवधी दिल्यास ते किती चिकन खाऊ शकतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, एका महिलेनं एका मिनिटात मिनिटात इतके चिकन खाल्लं की तिच्या नावावर विक्रमांची नोंद झाली आहे. 

Continues below advertisement


लेह शुतकेवर असं विश्वविक्रम बनवणाऱ्या महिलेचं नाव आहे. तिने एका मिनिटात चिकनचे 19 खाल्ले. तिनं एका मिनिटात 352 ग्रॅम चिकन खाऊन विक्रम रचलाय. लेह ही लंडनची रहिवासी आहे. लेहपूर्वी हा विक्रम नेला जोरच्या नावावर होता. ज्यांनी एका मिनिटत 298 ग्रॅम चिकन खाऊन हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. 


व्हिडिओ-



लेह स्वत:च्या कामगिरीवर निराश
एक मिनिटात 358 ग्रॅमचिकन खाऊन लेहनं विश्वविक्रमाची नोंद केली होती. मात्र, तरीही लेह आपल्या कामगिरी निराश झाली आहे. एका मिनिटात या पेक्षा जास्त चिकन खाता आलं असतं, अशी खंत लेहनं व्यक्त केली आहे. या विश्वविक्रमाशिवाय लेह नावावर खाण्याशी संबंधित 27 विक्रमाची नोंद आहे. त्यामुळं 27 वेगवेगळ्या गोष्टींसाठी तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.


लेहनं 3 मिनिटांत सर्वाधिक जॅम ड्राफ्ट्स आणि सर्वात वेगवान काकडी खाण्याचा विश्वविक्रमही लेहच्या नावावर आहे. जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की ही काही मोठी गोष्ट नाही. एक लिटर भाजी करी पिण्याचा विक्रमही लेहच्या नावावर आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha