केरळ: देसी जुगाडच्या बाबतीत भारतातील लोकांशी कुणीही स्पर्धा करू शकत नाही. सोशल मीडियावर (Social Media) दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये असे काही अवलिया लोक असतात जे काही जुगाड करुन संपूर्ण जगाला हादरवून टाकतात. 


मग ते सायकलचं (Cycle) मोटारसायकलमध्ये (Bike) रूपांतर करणं असो किंवा स्वस्त कारचे (Cheap Car) लक्झरी कारमध्ये (Luxury Car) रूपांतर करणं असो... भारतीयांसाठी सर्व काही सोपं आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने मारुती सुझुकी 800 गाडीचं रुपांतर करोडो रुपयांच्या रोल्स रॉयस (Luxurious Rolls Royce) कारमध्ये केलं आहे.


केवळ 45 हजार रुपयांचा खर्च


खरं तर, केरळमधील एका तरुणाला रोल्स रॉयस कारची खूप आवड होती, पण त्याच्याकडे करोडो रुपयांची कार घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने एक जुगाड करण्याचा विचार केला. यासाठी त्याने मारुती 800 कार रूपांतरित करण्याचा विचार केला. तब्बल चार-पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्याने मारुती कारला पाच कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस कारमध्ये रुपांतरित केलं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व करण्यासाठी या तरुणाने केवळ 45 हजार रुपये खर्च केले.


यापूर्वीही केले आहेत असे पराक्रम


'ट्रिक्स ट्यूब' नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम अपलोड करण्यात आला होता, ज्यामध्ये या तरुणाबद्दल माहिती देण्यात आली होती. या तरुणाने चॅनलला सांगितलं की, त्याला असं करण्याची आवड आहे, त्याने यापूर्वीही असे बरेच पराक्रम केले आहेत. बाईकच्या इंजिनपासून त्याने जीपही बनवली आहे. तो जुन्या वाहनांचे भाग जमवतो, त्यांना एका वाहनात एकत्र करतो आणि स्वतःचं डिझाईन निर्माण करुन नवीन कार बनवतो.



देसी जुगाड पाहून लोक अचंबित


सध्या केरळमधील हा तरुण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच ही गाडी ज्या रस्त्यावरुन जाते, तिथे असलेले लोक न विसरता गाडीकडे मागे वळून पाहतात. ही कार एवढी स्वस्त असेल हे पहिल्या दृष्टीक्षेपात कोणालाच समजत नाही. हा देसी जुगाड पाहून सोशल मीडिया युजर्सही विविध प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण ही युक्ति पाहून अचंबित झाला आहे.


हेही वाचा:


मुलाला इन्स्टाग्राम लाईव्हवर Avneet Kaur सोबत बोलणं पडलं महागात; आईने मागून येऊन जोरदार लगावली, व्हिडीओ व्हायरल


Car loan Information:

Calculate Car Loan EMI