Kulhad Pizza Couple: गुजरातमधील कुल्हड पिझ्झा कपलचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचं प्रकरण मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. जोडप्याचा हा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सेहज अरोरा (Sehaj Arora) आणि गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) या दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण हा व्हिडीओ खरा नसून AI टेक्नॉलजीचा वापर करुन तो बनवण्यात आल्याचं सेहजने मागेच एक व्हिडीओ बनवून स्पष्ट केलं. 


कुल्हड पिझ्झा कपल सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करण्यात येत आहेत. यातच आता कुल्हड पिझ्झा जोडीतला सेहज अरोरा याने आत्महत्या (Suicide) केल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


सेहज याचं जनतेला आवाहन


सेहज अरोरा याने 30 सप्टेंबर रोजी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की, 'सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. या एकूण प्रकारानंतर दोन दिवसांपासून आम्हाला असंख्य कॉल येत आहेत. मुलाखती देण्याची सुद्धा माझ्यात आता शक्ती उरलेली नाही. कृपया हे करणं थांबवा.' त्याने पुढे लिहिलं की, 'माध्यमांना आवाहन आहे की, जुन्या मुलाखती (Interview) एडिट करून त्या अजिबात चालवू नका.'


आत्महत्या केल्याचं वृत्त खोटं


सेहजने जनतेला आवाहन करत म्हटलं, 'प्रिय जनता, कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीवर अजिबात विश्वास ठेवू नका.' सहजने फेसबुकवर एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचा दावा करणारे सर्व व्हिडिओ खोटे असल्याचं सांगून ते यूट्यूबवर दाखवले आहेत. त्याने लोकांना या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. आमचं कुटुंब मानसिक तणावात आहे असं सांगत त्याने अशा खोट्या बातम्या पसरवू नका अशी विनंतीही केली आहे.



'कुल्हड पिझ्झा' कपलची इंटरनेटवर चर्चा


हे जोडपे 'कुल्हड पिझ्झा' नावाने फूड बिझनेस चालवतात. या जोडप्याचं सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची 'पिझ्झा इन कुल्हड' विकण्याची अभिनव कल्पना. कुल्हड पिझ्झा खाण्यासाठी त्यांच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात लोक जमतात. या अनोख्या कल्पनेमुळे हे कपल आता इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत.


हेही वाचा:


VIDEO: नवऱ्याला जीवे मारण्यासाठी रचला कट; कॉफीमध्ये मिसळलं ‘ब्लीच’, धक्कादायक व्हिडीओ समोर