Viral Video: अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवनीत कौर (Avneet Kaur) नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि अभिनयामुळे लोकांमध्ये चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या 3 कोटींच्या घरात आहे. अवनीतचे इन्स्टाग्रामवर 3 कोटींहून अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत. ती कधी-कधी इन्स्टाग्रामवर लाईव्ह (Instagram Live) येऊन तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. 


सध्या तिचा या दरम्यानचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती इन्स्टाग्राम लाईव्ह व्हिडिओवर तिच्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. मात्र, या लाईव्ह व्हिडिओमध्ये अशी एक विचित्र घटना घडली, की अवनीतही ते पाहून चकित झाली आणि काही वेळातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.


नेमकं घडलं काय?


त्याचं झालं असं की, अवनीत लाईव्ह व्हिडिओवर तिच्या एका चाहत्याशी बोलत होती. ती व्हिडिओमध्ये म्हणाली, "माझ्यासाठी फॅन पेज तयार केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. देव तुला आशीर्वाद देईल. निरोगी राहा आणि सुरक्षित रहा." ती व्हिडिओच्या शेवटी म्हणाली, 'धन्यवाद, बाय बाय.'


आता तिचा चाहता फोन कट करणार... त्याच वेळी मागून त्याची आई आली. आई काही वेळ अवनीतला तिच्या मुलाशी मोबाईलवर बोलताना पाहत होती, पण मुलाला याचा अंदाज नव्हता. बोलून झाल्यावर ती मुलाची चांगलीच जिरवणार होती. पण व्हिडीओ संपण्याआधीच ती तिच्या मुलाच्या पाठीत जोरात मारते आणि विचारते, "कोण आहे ही?"


आईची प्रतिक्रिया पाहून अवनीतही हैराण


हे सर्व पाहून अवनीतलाही धक्का बसतो. तिचे हावभाव पाहून तिलाही हे पाहून शॉक बसल्याचं दिसतं. तिच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये असं काही घडले आहे यावर तिला विश्वास बसत नव्हता. त्या मुलाच्या आईला वाटलं की, तो कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत असावा. या गैरसमजातून आईने लाईव्ह व्हिडीओमध्येच त्याला जोरदार चापट मारली. आता त्या मुलाच्या आईने त्याच्यासोबत पुढे काय केलं हे माहीत नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.






यूजर्सने दिल्या मजेदार प्रतिक्रिया


या व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, 'त्याची आई अवनीतला त्याची गर्लफ्रेंड समजत होती.' तर दुसर्‍या एकाने म्हटलं की, 'आईकडून मुलाचं सुख पाहावलं गेलं नाही.' आणखी एकाने म्हटलं की, 'इतक्या सुंदर मुलीला दीदी म्हटल्याने आईला राग आला.'


हेही वाचा:


ना कॉलेजला गेला, ना निकाल आला... तरी बरेच वर्ष पालकांना फसवत राहिला मुलगा