Trending : अनेक वेळी आपण हॉटेमध्ये जेवण करायला कुटुंबासोबत जातो. गप्पा मारत कुटुंबासोबत आपण जेवण करतो. पण अनेक वेळा हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर उरलेले अन्न लोक वेटरला घेऊन जायला सांगतात. हे अन्न काही हॉटेलमधील लोक फेकून देतात. काही लोक राहिलेलं जेवणं वेटरला पार्सल करून द्यायाला सांगातात. असाच एका हॉटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवण करताना उलरलेलं अन्न डब्ब्यात पॅक करताना दिसत आहे.
अनेक वेळा हॉटेलमधील वेटर हे प्लॅस्टिकच्या डब्यामधून जेवण पार्सल करून देतात. व्हायरल व्हिडीओमधील व्यक्ती हा स्टिलच्या डब्ब्यात उरलेलं अन्न फॅक करताना दिसत आहे. नयना प्रेमनाथ यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये नयना यांनी अन्न वाया न घालणे तसेच हॉटेलमध्ये अन्न पॅक करण्यात लाज न बाळगणे याबाबत लिहिले आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ दहा लाखपेक्षा नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तसेच 53 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral video : प्राण्यांमध्ये देखील 'पुष्पा' ची क्रेझ; श्रीवल्ली गाण्यावर साँगवर हुकस्टेप करतोय गोरिला
- Viral Video : सुनेची सासूला बेदम मारहाण, एक रोटी जास्त खाल्ल्याचा राग
- महिलेनं 21 दिवसांत 15 लोकांना डेट केलं अन् प्रेमावर पुस्तक लिहिलं! आता म्हणतेय...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha