Trending : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या चित्रपटामधील गाणी आणि डायलॉग्स देखील हिट ठरले. चित्रपटामधील श्रीवल्ली गाण्यामधील हुकस्टाप करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक क्रिकेटर्स तसेच सेलिब्रिटी देखील या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.  


नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गोरिला हा पुष्पा चित्रपटामधील श्रीवल्ली या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील गोरिला हा प्राणिसंग्राहालयामध्ये चालताना दिसत आहे. चालता चालता अचानक हा गोरिला श्रीवल्ली गाण्यातील हुक स्टेप करण्यास सुरूवात करतो. एका क्रिएटिव्ह एडिटरनं हा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला 11 लाखपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी कमेंट करून 'पुष्पा चित्रपटाची क्रेझ', असं लिहिले आहे. 





अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील  'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha