Maleesha Kharwa: 'हीरे की परख जौहरी को होती है' हे हिंदी वाक्य तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ऐकलं असेल. याचा अर्थ, खरा हिरा केवळ सोनारच ओळखू शकतो. असाच एक हिरा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन (Robert Hoffman) याने शोधून काढला आहे. 'सिटी ऑफ ड्रीम' अशी ओळख असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरातील एका चिमुकलीचं आयुष्य रॉबर्ट हॉफमॅनमुळे पूर्णपणे बदललं आहे. या चिमुकलीचा धारावी (Dharavi) ते हॉलिवूड असा प्रेरणादायी प्रवास आहे. कोण आहे ही मुलगी? या मुलीला 'स्लम प्रिंसेस' का म्हटलं जातं? हे जाणून घेऊयात...
2020 मध्ये जेव्हा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन हा मुंबईमध्ये आला होता. तेव्हा तो मलीशा खारवा ( Maleesha Kharwa) नावाच्या धारावीमध्ये राहणाऱ्या चिमुकलीला भेटला होता. मलीशा ही जेव्हा रॉबर्ट हॉफमॅनला भेटली तेव्हा रॉबर्टनं तिच्यासाठी 'गो फंड मी' नावाचे पेज सुरु करण्याचे ठरले. त्यानंतर मलीशा ही फेमस होण्यास सुरुवात झाली.
दोन हॉलिवूड चित्रपटांच्या आल्या ऑफर्स, शॉर्ट फिल्ममध्ये देखील केलं काम
मलीशा ही सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाली तेव्हा तिला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या. तसेच तिनं लिव योर फेयरीटेल या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं आहे. ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये पाच लहान मुलांची कथा दाखवण्यात आली आहे, जे पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला जातात.
14 वर्षाची मलीशा ही आता 'द युवती कलेक्शन' या ब्रँडचा चेहरा बनली आहे. या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे.
मलीशा सोशल मीडिया असते अॅक्टिव्ह
मलीशा ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे. तिला इन्स्टाग्रामवर 235K फॉलोवर्स आहेत. मलीशा ही विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. या पोस्ट शेअर करताना ती अनेकदा The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे ती 'स्लम प्रिंसेस'या नावानं देखील ओळखली जाते. मलीशा ही तिच्या विविध फॉटोशूटचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या मॉडेलिंग करिअरसाठी अनेक जण तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.
संबंधित बातम्या
Trending : एका फोटोनं आयुष्य बदललं; फुगे विकणारी किस्बू झाली सोशल मीडिया स्टार