Cobra Viral Video : जगभरात अनेक प्रकारचे साप आढळून येतात. पण लोकांना विषारी आणि बिगर विषारी सापांमधला फरक लक्षात न आल्याने सापाला पाहताच एक तर पळ काढतात किंवा त्याचा जीव घेतात. सापाचं नाव जरी उच्चारलं तर बहुतांश जणांच्या अंगावर काटा उभा राहतो. याचं कारण म्हणजे सापाने चावा घेतल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा काही सेकंदात मृत्यू होऊ शकतो. यामुळे बहुतांश लोकांना सापाच्या जवळ जायची हिंमत होत नाही. नुसत्या सापाच्या फुतकाऱ्यानेच भल्याभल्यांची धांदल उडते. परंतु याला काही व्यक्ती अपवादही असू  शकतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती विषारी सापाला (Cobra Viral Video) आपल्या हातात पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी पाजत असल्याचं दिसून येत आहे. 


सर्वसामान्यत: सापांमध्ये किंग कोबराला सर्वात जास्त विषारी साप म्हणून ओळखलं जातं. घराच्या जवळपास जरी साप दिसून आला तरी लोक जीव वाचवण्यासाठी ओरडाओरड करत धूम ठोकताना दिसून येतात. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कोब्रा जातीच्या विषारी सापाला आपल्या हाताने पाणी पाजत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणत्याही व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती पाण्याने भरलेला ग्लासाने आपल्या हातात धरून किंग कोब्रा जातीच्या विषारी सापाला पाणी पाजत असल्याचं दिसून येत आहे.






किंग कोबरा या विषारी सापाला पाणी पाजत असलेला व्हिडीओ व्हायरल  


व्हायरल होत असलेला व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात केला जात आहे. या व्हिडीओला thebeautifulshorts नावाच्या प्रोफाईलवरून  पोस्ट केलं जातं आहे. या व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाचा किंग कोबरा जातीचा अत्यंत विषारी साप दिसून येत आहे. आपली तहान भागवण्यासाठी किंग कोबरा साप काचेच्या ग्लासमधील पाण्यात आपलं तोंड टाकून पाणी पित असल्याचं दिसून येतं आहे. पाणी पिल्यानंतर  साप आपलं डोक ग्लासाच्या बाहेर काढून पाणी पाजणाऱ्या व्यक्तीकडे पाहत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला आहे.


हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित


सध्या सोशल मीडिया अजस्त्र किंग कोबरा जातीच्या विषारी सापाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून अनेक नेटकऱ्यांच्या  अंगावर काटा उभा राहिला आहे. बहुतांश नेटकरी तर व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. आतापर्यंत व्हिडीओला सोशल मीडियावर 7 हजार 960 पेक्षा लाईक्स आणि 3 लाख 61 हजारहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. या व्हायरल व्हिडीओवर बहुतांश लोकांनी प्रतिक्रिया देताना अंगाचा थरकाप उडवणारा भीतीदायक अनुभव असल्याचं सांगत आहेत. तसेच बऱ्याच नेटकऱ्यांनी  या प्रकारच्या जीवघेणा खेळ खेळू नये, असाही सल्ला दिला आहे. 


वाचा ही बातमी 


Pune leopard : कुत्रा निवांत झोपलेला, बिबट्याने थेट सहा फुट उंच भिंतीवरुन झेप घेतली अन्...; थरारक व्हिडीओ समोर