World News: भारतात (India) एक म्हण आहे, 'जो करतो तोच भरतो.' म्हणजे तुम्ही एखादी चूक केली असेल किंवा गुन्हा केला असेल तर ते तुम्हालाच निस्तरावं लागणार, त्याची शिक्षा तुम्हालाच होणार. पण कोणी असं केलं तर की, एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा तीन पिढ्यांना दिली तर? आता हे ऐकायला वेगळं वाटत असलं तरी जगात असा एक देश आहे जिथे हा कायदा आहे. या देशात एखाद्या व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा ही त्याच्या तीन पिढ्यांना दिली जाते.


कोणता आहे असा देश?


तर हा देशा आहे - उत्तर कोरिया (North Korea), म्हणजे हुकूमशहा किम जोंग उनचा (Kim Jong Un) देश. जगभरात या देशाबद्दल विविध प्रकारच्या चर्चा आहेत. आता या देशातील कायद्याबाबत जाणून घेऊया. किम जोंगच्या देशात असा कायदा आहे, ज्यात जर चूक एका व्यक्तीची असेल तरी त्याची शिक्षा जवळपास त्याच्या पूर्णच कुटुंबाला दिली जाते.


उत्तर कोरियात एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला तर त्याची शिक्षा केवळ त्यालाच नव्हे, तर त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि मुलांनाही दिली जाते. आता प्रश्न पडतो की ही शिक्षा नेमकी कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आहे? तर तुरुंगात असलेले कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी हा कायदा उत्तर कोरियामध्ये करण्यात आल्याचं इंडिया टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.


केसांसाठी देखील आहे कायदा


उत्तर कोरियाच्या अनोख्या कायद्यांबद्दल बोलायचं झालं तर केस कापण्याबाबतही तिथे कायदे करण्यात आले आहेत. वास्तविक, उत्तर कोरियाच्या सरकारने लोकांना 28 प्रकारच्या हेअर कट स्टाईल दिल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी 18 आणि पुरुषांसाठी 10 हेअर कटिंग स्टाईल देण्यात आल्या आहेत.


याचा अर्थ तुम्ही उत्तर कोरियामध्ये राहात असाल तर तुम्हाला याच पद्धतीने केस कापता येतील. याशिवाय एखाद्याने जर वेगळ्या पद्धतीने केस कापले तर तो गुन्हा मानला जाईल आणि त्यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. याशिवाय उत्तर कोरियामध्ये असे अनेक कायदे आहेत, ज्यांची अंमलबजावणी इतर कोणत्याही देशात होऊ शकत नाही. यामुळे 21व्या शतकातही हा देश जगापासून दुरावलेला आहे. या देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न देखील खूप कमी आहे, त्यावर हुकूमशाह किम जोंग उन नागरिकांवर विचित्र कठोर कायदे करत असल्यामुळे तेथील जनतेचं जीवन जगणं दिवसेंदिवस कठीण होत आहे.


हेही वाचा:


Delhi: आजच्या दिवशी सगळेच का पाहू इच्छितात ताजमहाल? यामागे आहे 'हे' खास कारण