Taj Mahal: ताजमहाल (Taj Mahal) पाहण्यासाठी दररोज देश-विदेशातून हजारो पर्यटक (Tourist) येतात. ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावं लागतं, यानंतर पर्यटकांना ताजमहालमध्ये जाण्याची परवानगी दिली जाते. उत्तप प्रदेशच्या आग्र्यात ताजमहाल स्थित आहे. पूर्ण वर्षात आजच्याच दिवशी (28 ऑक्टोबर) लोक ताजहालला भेट देण्यासाठी गर्दी का करतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यामागचं कारण जाणून घेतलं तर तुम्हालाही ताजमहालला भेट देण्याची इच्छा होईल. तर यामागील खास कारण जाणून घेऊया.


आजचा दिवस का आहे खास?


यावेळी आज, म्हणजेच 28 ऑक्टोबरला पौर्णिमा आहे. या दिवशी ताजमहाल खूप सुंदर दिसतो. खरं तर, ताजमल बनवण्यासाठी वापरण्यात आलेला पांढरा संगमरवर पौर्णिमेच्या प्रकाशात चमकू लागतो. यामुळे चंद्राचं पृथ्वीवर पडणारं सौंदर्य आणखी वाढतं. हा खास क्षण पाहण्यासाठी ताजमहालात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि यासाठी अतिरिक्त भाडं देण्याचीही गरज नाही. तुम्हाला यासाठी सामान्य भाडं द्यावं लागेल. फक्त 400 लोकांना येथून चंद्र पाहण्याची परवानगी आहे. या सर्व पर्यटकांना 50-50 च्या आठ गटात ताजमहालात पाठवलं जातं.


ताजमहालच्या तिकीटाची किंमत किती?


ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय पर्यटकांना 50 रुपयांचं तिकीट खरेदी करावं लागतं. सार्क आणि बिमस्टेक देशांतील पर्यटकांना 540 रुपयांचं तिकीट खरेदी करणं बंधनकारक आहे. तर विदेशी पर्यटकांना ताजमहाल पाहण्यासाठी 1100 रुपये मोजावे लागतात.


स्टेप तिकिटाची आहे व्यवस्था


ताजमहाल हे देशातील एकमेव असं स्मारक आहे, जिथे स्टेप तिकीट प्रणाली (Step Ticketing System) लागू आहे. ऑगस्ट 2018 मध्ये ताजमहालची तिकिटं वाढवण्याचं कारण म्हणजे पर्यटकांची वाढती संख्या होतं. मात्र, तिकीटात वाढ होऊनही पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.


ताजमहालला भेट देणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने ASI ने डिसेंबर 2018 मध्ये ताजमहालवर स्टेप कटिंगची सिस्टीम लागू केली. ज्यानुसार आता ताजमहालचा मुख्य घुमट आणि मुख्य समाधी पाहण्यासाठी भारतीय आणि विदेशी पर्यटकांना 200 रुपयांचं अतिरिक्त तिकीट काढावं लागणार आहे.


ताजमहालच्या तिकिटांमधून जवळपास 150 कोटींची कमाई


अधिकृत आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमार 70 ते 80 लाख लोक ताजमहालला भेट देण्यासाठी येतात आणि त्यात सुमारे 80 हजार लोक परदेशी असतात. ताजमहालच्या तिकिटांबद्दल बोलायचं झालं, तर स्थानिकांसाठी 50 रुपये आणि परदेशींसाठी 1 हजार 100 रुपये तिकीट आकारण्यात येतं. 2017-18 ते 2021-22 या सुमारे 3 वर्षांत ताजमहालमधून 152 कोटी रुपयांची कमाई झाली. संपूर्ण ऐतिहासिक वास्तूंच्या कमाईच्या सुमारे 40 टक्के ही रक्कम होती. अहवालानुसार. ताजमहालला स्थानिक तिकीटातून 40 कोटी रुपये आणि परदेशी तिकिटांमधून 110 कोटी रुपये मिळतात.


हेही वाचा:


India: भारतातील सर्वात कमी शिकलेले जिल्हे कोणते? यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव तर नाही ना?