Districts of India: भारतातील सर्वाधिक सुशिक्षित राज्याबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा केरळचं (Kerala) नाव आधी डोळ्यासमोर येतं. हे खरं आहे. कारण केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथील सर्वच लोक शिक्षित आहेत. आता अशात भारतातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता माहीत आहे का? भारताने 2011 मध्ये एक जनगणना केली होती, ज्याद्वारे देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला होता. या संकलित केलेल्या डेटामध्ये नोंदवलेला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विविध भागातील लोकसंख्या आणि तेथील साक्षरता दर (Literacy Rate). या डेटामुळे भारतातील सर्वात कमी शिक्षित जिल्ह्यांचा परिचय झाला.
या जिल्ह्यातील लोक सर्वात कमी शिकलेले
भारतातील सर्वात कमी साक्षरता दर असलेला जिल्हा मध्य प्रदेश राज्यातील अलीराजपूर आहे. त्यात सरासरी साक्षरता दर फक्त 36.10 टक्के नोंदवला गेला. यात पुरुषांचा साक्षरता दर 42.02 टक्के आणि महिलांसाचा साक्षरता दर 30.29 टक्के इतका कमी आहे.
भारतातील सर्वात कमी शिक्षित असलेल्या दुसऱ्या जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास, तो जिल्हा छत्तीसगडमधील विजापूर आहे. या जिल्ह्यात सरासरी साक्षरतेचं प्रमाण 40.86 टक्के असून, त्यात पुरुषांचा साक्षरता दर 50.46 टक्के आणि महिलांचा साक्षरता दर 31.11 टक्के आहे.
छत्तीसगडमध्ये केवळ दोनच जिल्हे कमी शिक्षित
तिसरा सर्वात कमी शिक्षित जिल्हा हा दंतेवाडा आहे, जो छत्तीसगडमध्ये येतो. दंतेवाडीचा सरासरी साक्षरता दर 42.12 टक्के आहे, ज्यामध्ये पुरुषांचा साक्षरता दर 51.92 टक्के आणि महिलांचा साक्षरता दर 35.54 टक्के आहे.
मध्य प्रदेशातील झाबुआ हा 43.30 टक्के सरासरी साक्षरता असलेला चौथा सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे. हे पुरुषांसाठी 52.85 टक्के आणि महिलांसाठी 33.77 टक्के आहे.
ओडिशा राज्यातील नबरंगपूर हा भारतातील पाचवा सर्वात कमी शिक्षित जिल्हा आहे. येथे नोंदवलेला सरासरी साक्षरता दर 46.43 टक्के आहे, ज्यामध्ये पुरुषांचा साक्षरता दर 57.31 टक्के आणि महिलांचा साक्षरता दर 35.80 टक्के आहे.
केरळचा साक्षरचा दर 94 टक्के
भारतातील राज्यांपैकी केरळमध्ये 2011 मध्ये सर्वाधिक 94 टक्के साक्षरता दर होता. चंदिगड, हिमाचल प्रदेश आणि राजधानी दिल्लीचा प्रदेश सरासरीपेक्षा जास्त साक्षरता दरांसह केरळच्या पाठोपाठ आहे. उल्लेखनीय म्हणजे, देशातील सर्व आघाडीच्या राज्यांमध्ये जनगणनेच्या वेळी महिलांपेक्षा पुरुष अधिक साक्षर आहेत. जैन हा भारतातील सर्वाधिक साक्षर समुदाय आहे.
हेही वाचा: