Bihar : बिहारमधील (Bihar) एका प्राध्यापकानं दोन वर्ष नऊ महिने विद्यार्थ्यांना शिकवलं नसल्यानं त्यांचा 23 लाख 82 हजार पगार परत देण्याचा निर्णय घेतला होता. वर्गात एकही विद्यार्थी उपस्थित नसल्यानं त्यांनी हा पगार विद्यापीठाला सुपुर्द केल्याचं त्या प्राध्यापकांनी सांगितलं होतं. ललन कुमार (Dr lalan kumar) असं या प्राध्यापकांचं नाव आहे. मंगळवारी (5 जून) कुलसचिव डॉ आर.के. ठाकूर यांना ललन कुमार यांनी 23 लाख 82 हजाराचा चेक दिला होता. अनेकांनी ललन यांच्या या निर्णयाचे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले होते.  पण आता ललन कुमार यांनी कॉलेज प्रशासनाची माफी मागितली आहे. पगार परत देण्याचा दावा करणाऱ्या प्राध्यापकांनी माफी का मागितली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात त्यांनी माफी मागण्याचे कारण...


ललन कुमार यांनी लिखित स्वरुपात कॉलेज प्रशासनाची माफी मागितली आहे. ललन यांनी माफीनाम्यात लिहिलं आहे की, सहा वेळा बदलीचा प्रयत्न त्यांनी केला होता पण बदली न झाल्यानं त्यांनी पगार परत करण्याचा निर्णय घेतला. ललन यांनी सांगितलं की, कॉलेजची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. त्यानंतर कॉलेजमधील अन्य सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ललन यांना त्यांची चुक लक्षात आली.  


कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला ललन यांच्यावर आरोप 
ललन यांच्यावर विद्यार्थ्यांनी आरोप केले आहेत. ललन हे कमी वेळ वर्गात उपस्थित राहायचे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ललन यांच्या माफीनाम्याबाबत मुख्यध्यापक डॉ. मनोज कुमार यांनी सांगितलं की, 'त्यांच्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ललन यांना त्यांची चुक लक्षात आली त्यामुळे त्यांनी माफी मागितली. ललन यांना मानसिकदृष्ट्या त्रास झाला. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांची सुट्टी घेतली.'


लालन कुमार यांच्या खात्यात केवळ 970 रुपये
23 लाख 82 हजार पगार परत करण्याचा दावा करणाऱ्या ललन कुमार यांच्या खात्यामध्ये केवळ 970 रुपये होते, अशी माहिती कॉलजच्या एका कर्मचाऱ्यानं दिली.


ललन कुमार यांनी केला होता आरोप


ललन कुमार यांनी  विद्यापीठातील शिक्षण पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला होता. महाविद्यालयात नियुक्ती झाल्यापासून त्यांनी येथे अभ्यासाचे वातावरण पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते, इथे हिंदी विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1100 आहे, पण एकही विद्यार्थी या विषयाच्या तासाला उपस्थित नसतो. हजर विद्यार्थांची संख्या शून्य असते.  


हेही वाचा:


Bihar : प्राध्यापकाचा प्रामाणिकपणा; विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं 23 लाखांचा पगार केला परत!