Indian Passport colours : काही दशकांपूर्वी विमानातून प्रवास म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. पण अलिकडे सामान्य लोकांच्या हाती पैसा आल्यानंतर आता अनेकजण परदेशात पर्यटनासाठी आणि कामानिमित्ताने जातात. त्यामध्ये परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील वर्षाचा विचार करता तब्बल दोन कोटी भारतीय नागरिक परदेशात फिरायला गेले होते. परदेशात जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे  पासपोर्ट (Passport). निळ्या रंगाचा पासपोर्ट तर तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण भारतात एक नाही तर पाच वेगवेगळ्या रंगाचे पासपोर्ट आहेत आणि प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळं आहे. या पासपोर्टवरुन तुम्ही पर्यंटनासाठी आलात की सरकारी कामासाठी आलात किंवा आणखी काय याचा अंदाज येतो.


भारतीय पासपोर्टच्या मदतीने आपण कोणत्याही देशात सहजरित्या प्रवास करू शकतो. एखाद्या देशाच्या पासपोर्टचे महत्त्व त्या देशाची ताकद दर्शवते. आपण बऱ्याचदा आजूबाजूला निळ्या रंगाचा पासपोर्ट पाहतो. पण भारतीय पासपोर्ट हा केवळ निळ्या रंगाचा नसून एकूण चार रंगांमध्ये आहे. त्या प्रत्येक रंगाचे विविध अर्थ आहेत.


मरून रंगाचा पासपोर्ट (Maroon Colour Passport)


या रंगाचा पासपोर्ट अतिशय महत्वाचा असून त्याला डिप्लोमॅटिक पासपोर्ट असंही म्हटलं जातं. हा पासपोर्ट राजनैतिक अधिकारी तसेच  सरकारी अधिकाऱ्यांसाठी दिले जातात. तसेच  सरकारी अधिकाऱ्यांनाही याच रंगाचा पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी एक वेगळा अर्ज करावा लागतो. या अर्जावेळी संबंधित व्यक्तीला डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज का आहे विचारले जाते. या रंगाचा पासपोर्ट असणाऱ्या लोकांना  प्रवासाच्या ठिकाणापर्यंत सर्व सेवा या मोफत मिळतात. तसेच या प्रवाशांना व्हिसाची (Visa) गरज पडत नाही. 


पांढरा रंगाचा पासपोर्ट (White Colour Passport)


हा पासपोर्ट सरकारी कामानिमित्त विदेशात जाणाऱ्या लोकांना दिला जातो. सरकारी कामानिमीत्त परदेशात जाणारे लोक याचा उपयोग करू शकतात. याचासाठी देखील अर्ज द्यावे लागते. पाढऱ्या रंगाच्या पासपोर्टची का आवश्यकता का आहे हे सांगावे लागते. हा पासपोर्ट मिळाला की अनेक सुविधा मिळतात.  


निळा रंगाचा पासपोर्ट (Blue Colour Passport)


निळ्या  रंगाचा  पासपोर्ट सामान्य पासपोर्ट असून देशातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने नाव, बर्थ डेट (Birth Date) आणि बर्थ प्लेस (Birth Place) याचा उल्लेख असतो.  प्रवाशाचा फोटो, सही आणि संबंधित महत्वाचे कागदपत्रे दाखवल्यानंतर हा पासपोर्ट मिळतो. 


नारंगी  रंगाचा पासपोर्ट (Orange Colour Passport)


केंद्र सरकारने 2018 पासून नारंगी  रंगाचा  पासपोर्ट सुरू केला. हा पासपोर्ट एका विशिष्ट वर्गासाठी तयार केला गेला. ज्या लोकांचे शिक्षण हे 10 वी पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हा पासपोर्ट काढण्यात तयार करण्यात आला आहे. परदेशात अशिक्षित नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याला इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड (ECR) श्रेणी असं नाव देण्यात आले आहे.


ही बातमी वाचा: