Tree Plantation : या जगात नेहमीच अचंबित करणाऱ्या गोष्टी घडत असतात, ज्याबद्दल खूपच नवल वाटते. आज असाच एका अनोख्या सर्च इंजिन विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही अगदीच आश्चर्यचकीत व्हाल. एखाद्या वापरकर्त्याने कोणत्याही गोष्टीचा शोध घेतल्यानंतर 'हे'  सर्च इंजिन एक झाड लावल्याचा दावा करते. जाणून घेऊया याच आगळ्यावेगळ्या सर्च इंजिन बद्दल. 


टेक्नॉलॉजि (Technology) मध्ये सातत्याने नवनवीन बदल होत असतात. प्रत्येक वेळी काही नवखे बदल आपल्याला पाहायला मिळतात. आजकाल स्मार्टफोन्स घराघरात पोहोचले आहेत, सोबतच गूगल (google ) चा वापर आज प्रत्येक जण करतो. कोणत्याही विषयाबद्दल माहिती हवी असेल तर गूगलचा वापर हा सर्रास केला जातो. यामध्ये आपण कोणताही प्रश्न किंवा माहिती सर्च करू शकतो आणि त्याचे आपल्याला अगदी योग्य उत्तर मिळते. मात्र गूगलच्या व्यतिरिक्तही अजून असे काही सर्च इंजिन्स आहेत ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यापैकी एक सर्च इंजिन ज्यात यूजर्सना काहीही सर्च  केले, तर त्यातून आलेल्या कमाईतून एक झाड लावले जाते. ऐकायला भारी मजेशीर वाटत असले तरी हे खरे आहे. 


 






या सर्च इंजिनने आतापर्यंत लावली कोटींच्या संख्येने  झाडे


या आगळ्यावेगळ्या सर्च इंजिनचे नाव आहे इकोसिया (Ecosia GmBH). मूळतः ही जर्मन (german ) कंपनी आहे. याच कंपनी मधल्या एका कर्मचाऱ्याने 2009 साली याचा शोध लावला. आज हे सर्च इंजिन लाखो लोक वापरत आहेत. केलेल्या संशोधनातून समोर आले आहे की, या कंपनीने आजवर एक कोटींहून अधिक झाडे लावली आहेत. 


मिळालेल्या कमाईच्या 80 टक्के निधी झाडे लावण्यासाठी 


ज्याप्रमाणे गूगलवर कोणत्याही गोष्टीचा शोध घेतल्यानंतर त्याची कमाई ही त्या कंपनीला जाते, अगदी त्याचप्रमाणे या इकोसिया (Ecosia GmBH) सर्च इंजिनमध्ये तुम्हीही काहीही सर्च केले आणि माहिती मिळवली की त्याची कमाई ही  कंपनीला मिळते. या मिळालेल्या कमाईतील 80 टक्के रक्कम ही  वृक्षलागवडीसाठी दान केली जाते अशी माहिती कंपनीने दिली आहे. 


45 वेळा सर्च केले गेल्यानंतर लावले जाते एक झाड 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळात वापरकर्त्यांची संख्या 82 टक्क्याने वाढली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हवामानाच्या समस्यांबाबत लोकांमध्ये निर्माण झालेली जागरूकता. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश्चियन क्रोल यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्ष हा एकमेव प्रभावी घटक असू शकतो. तसेच त्यांनी सांगितले की, प्रत्येक 45 सर्चमुळे कंपनीला 0.25 डॉलर इतका नफा मिळतो आणि तो नफा मिळतो त्याचा वापर हा झाडे लावण्यासाठी केला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावणे हेच आता आमचे लक्ष्य असणार आहे. 


ही बातमी वाचा: