मुंबई : एकीकडे जेईई (JEE) आणि नीटमधील परीक्षांमध्ये घोटाळा होत झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकही संतप्त झाले आहेत. त्यामुळे, ह्या परीक्षा गरिबांच्या राहिल्या नाहीत, शिक्षणव्यवस्थेत आता गरिंबाचं काही राहिलं नाही, अशी ओरड होत आहे. मात्र, एखाद्या गरीब घरची लेक जेव्हा परिस्थितीशी संघर्ष करत जेईई सारख्या परिक्षांमधून स्वत:ला सिद्ध करते, तेव्हा हीच मुलगी लाखो गरिबांसाठी प्रेरणास्थान ठरत असते. तेलंगणातील मधुलता या आदिवासी कुटुंबातील मुलीने आयआयटी प्रवेशासाठीची असणारी जेईई परीक्षा क्रॅक केली. मधुलताने जेईई परीक्षेत 824 वी रँक मिळवत आयआयटी पटना येथे नंबर मिळवला. मात्र, घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने तिला आयआयटीसाठी (IIT) प्रवेश घेणे शक्य झालं नाही. याउलट ती आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी बकऱ्या चारायचं काम करत होती. मात्र, जेव्हा तेलंगणाच्या (Telangana) मुख्यमंत्र्‍यांना मधुमतीची बिकट परिस्थिती समजली तेव्हा त्यांनी तिला मदतीची हात दिला. 


आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, मधुलता एका आदिवासी कुटुंबातील विद्यार्थीनी असून तिच्या कुटुंबीयांचा आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. उदरनिर्वाहासाठी तिला देखील बकऱ्या सांभाळण्याचं आणि चरायला नेण्याचं काम करावं लागतं. मात्र, अशा परिस्थितीतही मधुलताने अनुसूचित जमाती या प्रवर्गातून 824 वी रँक मिळवत जेईईतून आयआयटी क्रॅक केली. त्यामुळे, पटना येथील आयआयटीमध्ये तिला बी टेकसाठी प्रवेशही मिळाला. मात्र, तेथील इतर खर्चासाठी आवश्यक असणारे अडीच लाख रुपये तिच्या कुटुंबीयांकडे नसल्याने तिने अद्यापही प्रवेश घेतला नव्हता. याउलट कुटुंबीयांसाठी ती बकऱ्या चरायला नेण्याचं आपलं काम नियमित करत होती. केवळ 17000 रुपयेच तिच्या कुटुंबीयांना जमवता आले. त्यामुळे, ज्या आदिवासी वेल्फेयर ज्युनियर कॉलेजमधून तिने 12 वीची परीक्षा दिली. त्या कॉलेजमधील शिक्षकांनी मधुलताच्या मदतीसाठी आवाहन केलं, काही अधिकाऱ्यांकडे विनंतीही केली. त्यानंतर, ही बातमी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे, तात्काळ मुख्यमंत्री रेड्डी यांनी तिला मदत केली. 


मुख्यमंत्र्‍यांचं ट्विट, राज्य सरकारने केली मदत


मुख्यमंत्र्‍यांनी आदिवासी विद्यार्थीने मधुलताची परिस्थिती लक्षात घेऊन, राज्य सरकारच्यावतीने तिला आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले. बुधवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मधुलताला ट्विटरवरुन शुभेच्छाही दिल्या आहेत. कठीण परिस्थितीत संघर्ष करत तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतूकही केले. तसेच, आदिवासी कल्याण विभागाकडून मधुलताचं आयटी इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत देण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या गरीब विद्यार्थीनीने आदिवासी कल्याण मंडळाकडे 2,51,831 रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, राज्य सरकारने 1 लाख रुपये ट्युशन फी माफ केली असून जिमखान, परिवहन, मेस, लॅपटॉप व इतर शुल्क म्हणून 1 लाख 51 हजार, 831 रुपये तिला देऊ केले आहेत. त्यामुळे, मधुलताला आता आयआयटीमधून पुढील शिक्षण घेता येईल.






हेही वाचा


मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद; प्रवाशांचे हाल, नदीने पातळी ओलांडली


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI