2014-2024 Internet Users: नरेद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर डिजिटल इंडिया (Digital India) नावाने कॅम्पेनिंग आणि कामही सुरू केले. त्यानुसार, देशात इंटरनेटचा स्पीड वाढविण्यासाठी आणि ऑनलाईन सुविधा, शॉपिंग व बुकींगच्या सेवा क्षेत्रात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात स्मार्टफोनही प्रत्येकाच्या खिशातील गरज बनली. त्यामुळे, स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील इंटरनेट जुर्संची संख्या लक्षणीय वाढली. त्यातच, बँकी प्रणालीही स्मार्टफोनवर (Smartphone) आल्याने ही वाढ अधिकच होत गेली. गेल्या 10 वर्षात देशातील इंटरनेट (Internet) युजर्संच्या संख्येत मोठी वाढ झाली असून संसदेत मंत्रीमहोदयांनीच याची आकडेवारी दिली आहे.
लोकसभा सभागृहात देशातील इंटरनेट युजर्संच्या संख्येबाबत सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. टेलीफ़ोन आणि मोबाइल कनेक्शनची एकूण संख्या किती पटीने वाढली आहे, याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर, मोबाइल कनेक्शन, इंटरनेट आणि ब्रॉडबँडचा वापर देशात सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. देशात गेल्या 10 वर्षात टेलीफोन व मोबाइल युजर्ंसच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. माहिती प्रसार व ग्रामीण विकास राज्य मंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी संसदेत याबाबत माहिती दिली.
लोकसभा सदस्य कृष्ण प्रसाद टेन्नेटी आणि वाय.एस. अविनाश रेड्डी यांनी सरकारला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. टेलीफोन व मोबाईल युजर्सं आणि इंटरनेट व ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये झालेल्या वाढीचा तपशील मागितला होता. तसेच, या क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआई) किती झाली, असाही प्रश्न खासदार महोदयांनी विचारला होता. त्यावर, राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
टेलिफोन कनेक्शन किती वाढले
याप्रश्नी उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर म्हणाले की, 31 मार्च 2014 पर्यंत देशात टेलीफोन कनेक्शन 93.3 कोटी एवढे होते, तर 31 मार्च 2024 पर्यंत ही संख्या 119.87 कोटीवर पोहोचली आहे. यात एकूण 28.48 टक्के वाढ झाली आहे.
10 वर्षात मोबाईल कनेक्शन किती वाढले
31 मार्च 2014 पर्यंत देशात मोबाइल युजर्संची की संख्या 90.45 कोटी एवढी होती, तर 31 मार्च 2024 पर्यंत ही संख्या 116.59 कोटीपर्यंत पोहोचली आहे. यातही 28.90 टक्के वाढ झाली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2014 पर्यंत देशात इंटरनेट सब्सक्रिप्शन 25.16 कोटी होते, जे 31 मार्च 2024 पर्यंत 95.44 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये तब्बल 279.33 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ब्रॉडबँड सब्सक्रिप्शन 31 मार्च 2014 पर्यंत 6.09 कोटी होते. जे 31 मार्च 2024 पर्यंत 92.41 करोड़ झाले आहेत. म्हणजेच, गेल्या 10 वर्षात 1417.41 कोटींनी ही संख्या वाढली आहे.
10 वर्षात किती एफडीआय
दरम्यान, दूरसंचार क्षेत्र प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत सर्वात मोठ्या प्राप्तकर्तांपैकी एक आहे. दूरसंचार क्षेत्रात 2014-24 पर्यंत ही गुंतवणुकीतून 12 बिलियन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 2014-24 च्या कार्यकाळात 25-16 बिलियन अमेरिकी डॉलर्सचा एफडीआई प्राप्त झाला आहे.