मुंबई : महिला म्हटलं की, मेकअपचा (Make-Up) विषय आलाचं म्हणून समजा. स्त्रियांना नटण्याची हौस असते. महिलांना नटायला, सजायला आवडतं. मेकअप आवडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला लिपस्टिक (Lipstick) नक्कीच आवडते. लिपस्टिकच्या अनेक शेड्स आणि त्याचे वेगवेगळे प्रकार याचा आकडा खूप मोठा आहे. पण, तुम्ही वापरत असलेली लिपस्टिक नेमकी कशापासून तयार झाली आहे, त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.


लिपस्टिक कशी बनवली जाते?


अनेकदा असं म्हटलं जातं की, लिपस्टिकमध्ये माशाच्या तेलाचा वापर केला जातो, हे खरं आहे का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या. हो, हे खरे आहे की, लिपस्टिक तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर केला जातो. अनेक वेळा  लिपस्टिक तयार करण्यासाठी माशाचं तेल वापरलं जातं. खरं तर, शार्क लिव्हर ऑइल (Squalene) आणि फिश स्केल (Guanine) बहुतेकदा लिपस्टिक बनवण्यासाठी वापरलं जातं. 


लिपस्टिकमध्ये माशाचं तेल वापरण्याचं कारण काय?


शार्क लिव्हर ऑइल आणि फिश स्केल यांचा वापर लिपस्टिकचा ओलावा दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय लिपस्टिकमध्ये मेण, रंगद्रव्ये, सुगंध, ग्लॉस यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो. याशिवाय, विविध कंपन्या लिपस्टिकमध्ये इतरही अनेक गोष्टी वापरतात. पण त्यांची माहिती कंपनीकडून सार्वजनिक केली जात नाही.


लिपस्टिक बनवण्याची प्रक्रिया काय?


लिपस्टिक बनवण्यासाठी अनेक ब्रँड्स माशाच्या तेलाचा वापर करतात. लिपस्टिक तयार करण्यासाठी सर्वात आधी पिगमेंट निवडला जातो. पिगमेंट हा एक प्रकारचा रंग असतो. पिगमेंट मिसळून वेगवेगळे रंग म्हणजेच लिपस्टिकचे शेड्स तयार केले जातात. यासाठीचे प्रमाण म्हणजे दोन भाग तेल आणि एक भाग पिगमेंट असतात.


यानंतर, लिपस्टिक मोल्डिंगची प्रक्रिया केली जाते. मोल्डिंग म्हणजे लिपस्पिकला विशिष्ट साच्यात आकार दिला जातो. दरम्यान,  लिपस्टिक मोल्डिंग प्रक्रिया विशिष्ट तापमानावर केली जाते आणि नंतर ती लवकर थंड केली जाते. या प्रक्रियेत या मिश्रणात कुठेही हवा जाणार नाही याची काळजी घेणे, अत्यंत आवश्यक आहे. लिपस्टिकचं मिश्रण थंड झाल्यावर, उत्पादनाला साच्यातून बाहेर काढले जाते आणि लिपस्टिक तयार होतात, नंतर पॅकेजिंग पूर्ण झाल्यानंतर लिपस्टिक बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात.


लिपस्टिक प्राण्यांचा देखील वापर?


लिपस्टिक बनवण्यासाठी प्राचीन काळापासून प्राणी आणि कीटकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा वापर केला जात आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून, खाद्यपदार्थ आणि अगदी कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वेगन असण्यावर भर दिला जात आहे. आता काही ब्रँड्सनी लोकांच्या मागणीनुसार, शाकाहारी सौंदर्यप्रसाधनेही बनवायला सुरुवात केली आहे, पण तरीही अनेक मेकअप उत्पादनांमध्ये प्राण्यांची त्वचा आणि शरीराचे इतर अवयव वापरले जात आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


'या' देशात रेड लिपस्टिकवर बंदी, किम जोंग उनचं अजब फर्मान; कारण आहे विचित्र