Red Lipstick Ban in North Korea : उत्तर कोरियाचा ( North Korea ) हुकूमशाह किंम जोंग उन ( Kim Jong Un ) नेहमी त्याच्या नागरिकांवर विचित्र नियम आणि बंधने लादताना पाहायला मिळतं. उत्तर कोरियामध्ये महिलांचं सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी ( Ban Red Lipstick ) घातली आहे. किम जोंगने अजब फर्मान काढत महिलांच्या रेड लिपस्टिकच्या वापरावर बंदी ( North Korea Ban Red Lipstick ) घातली आहे. इतकंच नाही तर महिलांनी सौंदर्य प्रसाधनं ( Cosmetics ) वापरण्यावरही बंदी आहे. यामागचं कारणही फार विचित्र आहे.


मेकअप हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महिला सौंदर्यासाठी विशेष काळजी घेतात. लिपस्टिक हा महिलांच्या मेकअपचा फार महत्त्वाचा भाग आहे. महिलांचा लिपस्टिकसाठीटं प्रेम काही नवीन नाही. पण उत्तर कोरियामध्ये महिलांचं सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी घातली आहे. आता उत्तर कोरियाचा हुकुमशाह किंम जोंग उन याने महिलांसाठी विचित्र नियम लागू केला आहे.


रेड लिपस्टिकवर बंदी


कोणताही कार्यक्रम असो वा उत्सव मेकअप केल्यावरच महिलांचा लूक पूर्ण होतो. लाल रंगाची लिपस्टिक महिलांची आवडती असते. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने महिलांच्या लाल लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. उत्तर कोरियामध्ये लाल रंग भांडवलशाहीशी संबंधित आहे, त्यामुळे या रंगाची लिपस्टिक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


लाल लिपस्टिकवर बंदी घालण्याचं कारण काय?


उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन नेहमीच नागरिकांसाठी विचित्र नियम लागू करतो. आता नव्या मीडिया रिपोर्टनुसार, लाल रंग हा भांडवलशाही (Capitalism), कम्युनिस्ट (Communism) आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद (Individualism) यांचं प्रतिक मानला जातो. व्यक्ती स्वातंत्र्यवाद म्हणजे स्वतःपेक्षा अन्य कोणीही मोठा नाही अशी भावना होय. यामुळे उत्तर कोरियामध्ये लाल रंगांची लिपस्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


मेकअपची दररोज केली जाते तपासणी


उत्तर कोरियामध्ये नियमांचं कोण पालन करतंय की नाही हे पाहण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. ही पेट्रोलिंग टीम दररोज महिलांच्या मेकअपची तपासणी करते. इतकंच नाही तर महिलांचं सामान तपासून त्यामध्ये रेड लिपस्टिक असेल, तर जप्त केली जाते. नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई केली जाते आणि दंडही आकारला जातो.


'या' गोष्टींवरही आहे बंदी 


उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टिक लावण्यावरच नाही तर मेकअप करणे आणि केसांना कलर करण्यावरही बंदी आहे. उत्तर कोरियातील महिला फक्त उत्तर कोरियामध्ये बनवली जाणारी सौंदर्यप्रसाधने वापरू शकतात. याशिवाय महिलांना हलक्या रंगाची लिपस्टिक लावण्याची परवानगी आहे. येथे महिलांना केसांना रंग लावण्याचीही परवानगी नाही, कारण केसांना कलर करणे सरकारच्या विरोधात असल्याचे मानले जाते. स्त्रियांना त्यांचे मोकळे सोडण्याचीही परवानगी नाही. चेन, अंगठी, ब्रेसलेट असे दागिने घालण्यावरही उत्तर कोरियात बंदी घालण्यात आली आहे.