Viral Video : रेल्वे स्थानकांवर (Railway Staion), लोकांना अनेकदा सल्ला किंवा इशारा दिला जातो की, रेल्वे रुळांवर अजिबात जाऊ नका, तरी काही लोकं ते ऐकत नाही. ते बेधडकपणे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा लोक अपघातालाही बळी पडतात. असाच काहीसा प्रकार रेल्वे स्थानकांवरही पाहायला मिळतो. अधिक कष्ट नको म्हणून, एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी लोकं रुळ ओलांडू लागतात. याचा अनेकांना किती मोठा परिणाम भोगावा लागला? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.


केवळ दैव बलवत्तर म्हणून..
या व्हिडीओमध्ये एक माणूस अशाच एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून, नाहीतर, एका सेकंदाच्या विलंबाने त्याचा मृत्यू झाला असता व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दोन रुळांमधील लोखंडी रेलिंग ओलांडून उडी मारते आणि नंतर ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा बूट ट्रॅकच्या मधोमध अडकतो. त्यावेळी तो त्याचा पाय उचलतो आणि ट्रॅकपासून दूर जातो, परत तो बूट घेण्यासाठी ट्रॅक ओलांडू लागतो. त्याचवेळी, एक ट्रेन तिथे पोहोचते, त्यानंतर तो घाईघाईने प्लॅटफॉर्मवर चढू लागतो. केवळ नशीब चांगले म्हणून त्याचा जीव वाचला, पण त्याचे बेफिकीरपणे वागणे त्याच्यासाठी घातक ठरणारे होते.


 






 


ट्रेन अपघातात एक माणूस कसा थोडक्यात बचावला? पाहा व्हिडीओ


हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुमचा जीव तुमच्या बूटांपेक्षा अधिक मौल्यवान आहे, चपलांचे काय, ते बाजारात मिळतात. जातील, पण. तुमचे आयुष्य पुन्हा मिळणार नाही'.


'त्याला त्याच बुटाने मारा' नेटकऱ्यांचा संताप


अवघ्या 22 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 32 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने रागात लिहिले आहे की, 'त्याला त्याच बुटाने मारा', तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'वाढत्या वयाबरोबर लोकांची बुद्धी कमी होणे सामान्य आहे'. त्याचप्रमाणे इतर अनेक वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Watch: लग्नात नवरदेवाच्या मित्रांची चक्क साडी नेसून एन्ट्री; शिकागोमधील व्हिडीओ व्हायरल