एक्स्प्लोर

Leave Request : माझा ब्रेकअप झालाय, सावरण्यासाठी थोडा वेळ हवाय; कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने बॉसला सुट्टीसाठी पाठवलेला ई-मेल व्हायरल

Leave Request : अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने पाठवलेला सुट्टीचा ईमेल सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. कारण, या ईमेलमध्ये त्याने दिलेलं सुट्टीचं कारण अगदी अनपेक्षित आणि सगळ्यांनाच थक्क करणारं आहे.

मुंबई: अनेकदा आपण सुट्टीसाठी आपल्या मॅनेजरला मेल लिहत असतात. बाहेर जाण्याची वेळ आल्यामुळे काही वेळा सुट्टीचं खरं कारण वैयक्तिक असल्याने दुसरं कारण सांगावं लागतं. मात्र, अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने पाठवलेला सुट्टीचा ईमेल सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल (Gurgaon CEO calls employees breakup leave) झाला आहे. कारण, या ईमेलमध्ये त्याने दिलेलं सुट्टीचं कारण अगदी अनपेक्षित आणि सगळ्यांनाच थक्क करणारं आहे.(Gurgaon CEO calls employees breakup leave)

गुरगावमधील ‘नॉट डेटिंग’ या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जसवीर सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याचा “सर्वात प्रामाणिक सुट्टीचा अर्ज” दाखवला आहे. जसवीर यांनी या पोस्टसोबत लिहिले, “Gen Z काहीही लपवत नाही”, म्हणजेच आजची पिढी आपल्या भावना आणि मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी निःसंकोचपणे व्यक्त करते.(Gurgaon CEO calls employees breakup leave)

Leave Request : कामावर लक्ष केंद्रीत करण्यात होत होती अडचण

या घटनेबद्दल बोलताना जसवीर सिंह म्हणाले की, त्यांना त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडून ईमेल आला होता. त्या ईमेलमध्ये वैयक्तिक कारणामुळे काही दिवसांची रजा मागण्यात आली होती. संबंधित कर्मचाऱ्याने स्पष्टपणे लिहिले होते की, ब्रेकअपनंतर कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे, त्यामुळे स्वतःला सावरण्यासाठी काही दिवसांची गरज आहे. त्या अर्जात लिहिले होते , “अलीकडेच माझं ब्रेकअप झालं आहे आणि मी सध्या कामावर लक्ष देऊ शकत नाही. मी आज घरून काम करत आहे, मला २८ ते ८ तारखेपर्यंत सुट्टी घ्यायची आहे.”

Leave Request : लोकांनी बॉसच्या निर्णयाचं कौतुक केलं

या पोस्टनंतर अनेकांनी त्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं आणि जसवीर सिंह यांच्या प्रतिसादाचं कौतुक केलं. काहींनी म्हटलं की, आता ऑफिस कल्चर बदलत आहे, लोक मानसिक आरोग्य आणि भावनांबद्दल खुल्या मनाने बोलू लागले आहेत, हे सकारात्मक आहे.

अनेक यूजर्सनी जसवीर सिंह यांना विचारलं, “तुम्ही रजा मंजूर केली का?” त्यावर जसवीर हसत म्हणाले, “हो, लगेच मंजूर केली.” या उत्तरानंतर लोकांनी त्यांच्या या निर्णयाचंही भरभरून कौतुक केलं. काही यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिलं,“हे अगदी ठीक आहे, आणि जर कारण सांगितलं नाही तरी चालेल.” तर  यूजरने गंमतीत म्हटलं, “काही लोक तर लग्नासाठीही एवढी सुट्टी घेत नाहीत!” त्यावर जसवीर सिंह हसत म्हणाले, “पण माझं असं मत आहे की, ब्रेकअपसाठी लग्नापेक्षा जास्त सुट्टी लागते!”

महत्त्वाच्या बातम्या

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Embed widget