(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Space Facts: जेव्हा सूर्य आकाशात असतो तेव्हा आकाश निळे दिसते; पण मग अंतराळात अंधार कसा? जाणून घ्या...
Space Facts: अंतराळात सूर्यप्रकाश नक्कीच असतो, पण तिथे हवा नसल्याने वातावरण निर्मिती होत नाही, प्रकाशही पसरू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या डोळ्यांना अंतराळात काळाकुट्ट अंधार दिसतो.
Space Facts : सूर्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर उजेड पसरतो. सूर्य मावळला (Sunset) की, सगळीकडे अंधार पसरतो. सूर्यप्रकाशामुळे आकाश आपल्याला निळं (Blue Sky) दिसतं आणि रात्री सूर्य मावळल्यावर मात्र सगळीकडे अंधार (Black Sky) पसरतो. परंतु, अंतराळाच्या (Space) बाबतीत असंं होत नाही, तिथे सूर्य उगवल्यानंतर (Sunrise) देखील सर्वत्र अंधारच (Dark) असतो आणि सूर्य मावळल्यावरही अंधारच असतो. आता प्रश्न असा पडतो की, असं का बरं होते? जेव्हा सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीवरचे आकाश निळे दिसू शकते, तर अंतराळात असलेला सूर्य तिथे प्रकाश का देऊ शकत नाही? नेमके यामागील कारण काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात...
अंतराळात नेहमी काळाकुट्ट अंधार का?
यामागे एक साधे तत्त्व आहे. आकाशाचा रंग आपल्याला निळा दिसतो, कारण जेव्हा सूर्यकिरण (Sunrays) पृथ्वीच्या वातावरणात (Atmosphere) प्रवेश करतात, तेव्हा प्रकाशाच्या विखुरण्यामुळे आणि वातावरणात असलेल्या धुळीच्या कणांमुळे (Dust Particles) हा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि आकाशाचा रंग निळा दिसतो.
अंतराळात (Space) ना वातावरण निर्मिती होत, ना सुर्याचा प्रकाश कुठे पसरत. यामुळेच अंतराळात नेहमी काळाकुट्ट अंधार (Dark) पसरलेला दिसतो. यावरून हे स्पष्ट होते की, जर अंतराळात पृथ्वीसारखी हवा (Air) आणि वातावरण (Atmosphere) असतं, तर तिथेही प्रकाश सर्व दिशांना विखुरला असता आणि कदाचित तिथेही आकाशाचा रंग निळा दिसला असता.
डोळ्यांचीही महत्त्वाची भूमिका
ही गोष्ट एका उदाहरणानेही समजू शकते. जेव्हा आपण अंधाऱ्या खोलीत (Dark Room) टॉर्च लावतो, तेव्हा त्याचा प्रकाश (Light) थेट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही, परंतु ज्या दिशेने आपण टॉर्च (Torch) मारतो त्या दिशेने तो प्रकाश पसरला जातो. असे घडते, कारण टॉर्चचा प्रकाश खोलीत असलेल्या धुळीच्या कणांसोबत (Dust Particles) मिसळतो आणि एक प्रतिमा तयार करतो आणि ती प्रतिमा आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते तेव्हा आपल्याला समजते की, टॉर्चचा प्रकाश खोलीत पसरत आहे.
अंतराळातही काही असेच घडते. अंतराळात सूर्यप्रकाश नक्कीच असतो, पण तिथे हवा आणि वातावरण निर्मिती होत नसल्याने प्रकाश पसरू शकत नाही आणि म्हणूनच अंतराळात आपल्या डोळ्यांना नेहमी काळाकुट्ट अंधार पसरलेला दिसतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI