Gym Workout Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी थरारक स्टंटचे, कधी गंमतदार, प्राण्याचे तर कधी आणखी काही. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा अशा व्हायरल व्हिडीओमुळे काही लोकही प्रचंड चर्चेत येतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर दोन फिटनेस फ्रिक आजोबांच्या वर्कआऊटची (Workout) जोरदार चर्चा आहे. या आजोबांचा उत्साह आणि वर्कआऊट अगदी तरुणाईलाही लाजवेल असा आहे.
सोशल मीडियावर दोन आजोबांचा ओपन जिममधील वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून या दोन्ही आजोबांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या दोन्ही आजोबांचं वर्कआऊट पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ
फिटनेस फ्रिक आजोबांची जोरदार चर्चा
साधारणपणे तरुणांमध्ये फिटनेसची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतो. यासाठी ते जिम, कार्डिओ याशिवाय वेगवेगळे वर्कआउट करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन आजोहा दिसत आहेत. हे दोन्ही आजोबा ओपन जिममध्ये व्यायाम करत आहेत. या व्हिडीओमध्ये दोन्ही आजोबा ओपन जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत. दोघेही वृद्ध लोक खूप कठीण वर्कआऊट करताना दिसतात. हे वर्कआऊट कोणत्याही साध्या व्यक्तीला जमणार नाही असं आहे. त्यांच्या वर्कआऊटवरून त्यांची मेहनत स्पष्ट दिसते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स चकित झाले आहेत.
व्हिडीओला तीन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज
फिटनेस फ्रिक आजोबांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर bodybuilders नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तीन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लाखो युजर्सने या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट करत आजोबांचं कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या