Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना निशाणा बनवला. हल्ल्यात जखमी नागरिकांना रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडिताच्या दुकानावर गोळीबार केला. या हल्ल्यातील जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी दिवसभरातील तिसरा हल्ला आहे. 


दहशतवादी हल्ल्यात चोटीगाम गावातील बाळकृष्ण यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मिरी पंडिताच्या दुकानदारावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.


दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी पहिल्यांदा श्रीनगर जिल्ह्यातील मैसुमा परिसरात सीआपीएफच्या जवानांवर गोळीबार केला. त्यामध्ये एक जवान शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पुलवामाच्या लाजुरा गावात हल्ला केला. यात दोघे जण जखमी झाले. लष्कराने त्यांना तत्काळ उपचासाराठी रूग्णालयात दाखल केले. दोन्ही ठिकाणी हल्ला झाल्यानंतर लष्कराने नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी रात्री तिसरा हल्ला केला. 


लष्कराकडून सध्या नाकेबंदी करत दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha