एक्स्प्लोर

Wine Theft : जोडप्यानं चोरल्या 14 कोटी रुपयांच्या 45 वाईन बॉटल्स, 14 कोर्स मिल ऑर्डर करत रचलं कुभांड

Couple orders 14 course meal : एका कपलने मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमधून 14 कोटी रुपयांच्या 45 वाईनच्या बाटल्या चोरण्यासाठी कपलने 14 कोर्स मिल ऑर्डर केलं. या जोडप्याला आता न्यायालयीने शिक्षणा सुनावली आहे.

Couple Steal 45 Wine Bottles Worth 14 Crore : एका जोडप्याने हॉटेलमधून 14 कोटी किंमतीच्या वाईनच्या बॉटल्स (Wine Bottles) चोरल्या. या गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे हे कपल वाईन बॉटल चोरण्यासाठी पूर्ण योजना कररून हॉटेलमध्ये गेले. मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांनी 14 कोर्स मिल ऑर्डर केलं आणि यावेळी ठरल्याप्रमाणे हॉटेल स्टाफच्या नाकाखालून प्रत्येकी 3 कोटी किंमतीच्या म्हणजेत सुमारे 14 कोटी किंमतीच्या वाईन बॉटल चोरी केल्या. 

14 कोटी रुपयांच्या 45 वाईनच्या बाटल्या चोरी

अनेक जण दारुचे शौकीन असतात, त्यातल्या त्यात काही जणांना वाईन फार आवडते. वाईन जितकी जुनी होते, तेवढी वाईनची किंमत वाढते. ज्यांना वाईन परवडते. तर काही जण यासाठी चोरी करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. स्पेनमधील एका जोडप्याने हेच केलं. या जोडप्याने सुमारे 14 कोटी रुपयांच्या महागड्या वाईन बॉटल चोरल्या. याप्रकरणी त्यांना आता शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमधून वाईनच्या बाटल्या केल्या लंपास

स्पेनमधील ही घटना आहे. स्पेनमधील न्यायालयाने सोमवारी (6 मार्च) या जोडप्याला रेस्टॉरंटमधील सुमारे 13 कोटी 91 लाख 50 हजार 865 रुपये (1.7 मिलियन डॉलर) किमतीची वाईन चोरल्याप्रकरणी आरोपी ठरवत शिक्षा सुनावली आहे. ही वाईन चोरीची घटना 2021 रोजी समोर आली होती.

चोरीमुळे हॉटेलचं मोठं नुकसान

मीडिया रिपोर्टनुसार, स्पेनमधील (Spain)कॅसेरेस (Caceres) शहरातील एट्रिओ नावाचे प्रसिद्ध मिशेलिन स्टार हॉटेल (Atrio Restaurant Hotel) आहे. हॉटेल आपल्या खाद्यपदार्थ आणि सेवांप्रमाणेच महागड्या वाइन कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमधून सुमारे 45 दारूच्या बाटल्या चोरीला गेल्या होत्या. वाईनच्या काही बाटल्या 19व्या शतकातील होत्या. वाईनच्या बाटली खूप महाग होत्या, त्यामुळे या वाईनच्या बॉटल चोरीला गेल्या हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. 

ब्युटी क्विन महिलेसोबत मिळून बॉयफ्रेंडने केली चोरी

मीडिया रिपोर्टनुसार, या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी महिला ब्युटी पेजंट विजेती आहे. ही महिला बनावट पासपोर्टवर स्पेनमधील हॉटेलमध्ये गेली होती. महिलेने हॉटेल बूक करून बनावट पासपोर्टवर तेथे पोहोचली. त्यानंतर तिने रात्री दोन वाजता रिसेप्शनवर कॉल करून हॉटेल स्टाफला सॅलड बनवण्याची ऑर्डर दिली. आधी कर्मचाऱ्याने नकार दिला. पण महिलेच्या जिद्दीमुळे त्याने सॅलडची ऑर्डर घेतली. त्यानंतर कर्मचारी किचनमध्ये सॅलड तयार करत असताना या महिलेच्या बॉयफ्रेंडने वाईन ठेवलेल्या रुमची चावी रिसेप्शनवरून चोरली आणि वाईनच्या 45 बॉटल चोरल्या आणि पसार झाले.  

4 वर्षे तुरुंगवास आणि दंड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅसेरेस येथील न्यायालयाने आरोपी जोडप्याला हॉटेलमध्ये घुसखोरी आणि चोरी प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने महिलेला चार वर्षे तर पुरुषाला साडेचार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या जोडप्याला जुलै 2022 मध्ये क्रोएशियामध्ये अटक करण्यात आली होती. एवढंच नाही तर न्यायालयाने या दाम्पत्याला या हॉटेलला 6 कोटी 59 लाख 6 हजार 916 रुपये (753,454 युरो) दंडही ठोठावला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Embed widget