Trending Mumbai Local : गेले 3 ते 4 दिवस मुंबईत (Mumbai) मुसळधार पाऊस सुरू आहे. कितीही पाऊस पडला तरी कामाच्या निमित्ताने लोकांना घराबाहेर पडावे लागते, अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी हा पाऊस एखाद्या आपत्तीपक्षा कमी नाही कारण घर ते लोकल ट्रेनचा (Local Train) प्रवास चाकरमान्यांना भर पावसात करावा लागतो, ज्यामुळे ओलं होण्याची शक्यता वाढते. मुंबईच्या मुसळधार पावसातलोकल ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकत टाकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लोकल ट्रेनमध्ये एका लोखंडी रॉडर शाल, चादर आणि टॉवेल लटकलेला दिसतो.


 






 


व्हिडीओवर मजेदार कमेंट्स


शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या वर मजकूर लिहीला आहे की, "मुंबई लोकल थिंग्स". व्हिडीओवर यूजर्सच्या मजेशीर कमेंट्सही येत आहेत. एका युजरने ‘आमची मुंबई’ असे म्हटले आहे. तर दुसर्‍याने विनोदच केला, तो म्हणाला, "हे कपडे ऑलिम्पिकमधील राष्ट्रध्वजसारखे दिसत आहेत." तिसऱ्या युझरने दुसऱ्याला उत्तर दिले, "काय आश्चर्यकारक लोक आहेत" तर दुसऱ्याने लिहिले, "काय दृश्य आहे." एका युझरने "मी पहिल्यांदा पाहिले" असे पोस्ट केले.


मुंबईत जोरदार पाऊस


महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सतत पाऊस पडत असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हे ही वाचा-