Yogi Adityanath Fan in IND vs ENG ODI : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यातील प्रेक्षक गॅलरीमधील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका भारतीय व्यक्तीचा असून तो व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची स्तुती करताना दिसत आहे. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमधील गुंडांच्या घरावर बुलडोझर (Bulldozer) चालवून जी कारवाई केली, याबद्दल हा व्यक्ती कौतुक करत असून त्याने हातात बुलडोझरचा फोटो घेतला असून त्याच्या टी-शर्टवर ही योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. 


हा व्हिडीओ प्रेक्षकातीलच एका व्यक्तीने रेकॉर्ड केला असून यामध्ये बा व्यक्ती म्हणत आहे की,''मी आज आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं समर्थन करतो. आधी ज्या उत्तर प्रदेशमध्ये जाण्यापासून आणि राहण्यापासून लोक घाबरत होते. जिथे लूटपाट आणि गुंडागर्दी होत होती. तिथे आता मुख्यमंत्र्यांनी गुंडांच्या घरावर बुलडोझर चालवल्याने विकासच विकास होत आहे. अपराधी उत्तरप्रदेश सोडून निघून जात आहेत. मला इथे हे टी-शर्ट घातलेला पाहून सर्वजण मी उत्तर प्रदेशचा आहे असं म्हणत आहेत. मला या गोष्टीचा गर्व आहे की मी उत्तर प्रदेशचा आहे आणि माझे मुख्यमंत्री योगीजी आहेत.''


पाहा संपूर्ण व्हिडीओ -






 


सामन्यात भारत विजयी


तर हा व्हिडीओ शूट करण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 


हे देखील वाचा-