American Trending News : अमेरिकेतील (America) मेरीलँड (Marylan) राज्यातून एक सुखद असा व्हिडीओ (Viral Video) समोर येत आहे. याठिकाणी एक पोलिस ऑफिसर (Police) काही बदकांना वाचवण्यासाठी स्वत: थेट नाल्यात उतरल्याचं दिसून येत आहे. बदकांच्या या रेस्क्यू ऑपरेशनचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Ducks Viral Video) होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात नेटकरी लाईक करत असून विविध अशा चांगल्या कमेंट्सही या व्हिडीओवर येताना दिसत आहेत. या व्हिडीओतून माणूसकी अजूनही जिवंत असल्याचं यातून दिसून येत आहे.


तर मेरीलँड येथील ओल्नी (Olney) याठिकाणी काही छोटे बदक (ducks) एका नाल्यात पडले आणि तिथेच अडकले. ज्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली गेली. मोंटगोमरी पोलिस विभागाला (Montgomery County Police Department) एका औषधाच्या दुकानाजवळ एका नाल्यात काही बदक पडले असल्याचा फोन आल्याची माहिती पोलिस विभागाने दिली. ही महिती मिळाल्यानंतर लगेचच मोंटगोमरी पोलिसांमधील एक अधिकारी बदकांना वाचवण्यासाठी निघाले. संबधित पोलिस अधिकारी काही वेळातच याठिकाणी पोहोचले. घटनास्थळी पोहोचताच बदकांना अडकलेलं पाहून पोलिस अधिकारी स्वत: नाल्यात उतरला. त्याठिकाणी बदकांसाठी एक रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. मोंटगोमरी काउंटी फायर अँड रेस्क्यू सर्विसेलच्या मदतीने पोलिस अधिकाऱ्याने नाल्यात जाऊन बरीच मेहनत घेऊन 8 बदकांना जीवनदान दिलं. बदकही त्यांच्या आईला भेटल्यानंतर अगदी आनंदी झाल्याचं दिसून आलं. 


पाहा संपूर्ण व्हिडीओ - 



हे ही वाचा-