Liquor Shop On Tractor : तुम्ही कधी ना कधी, कुठे ना कुठे दारुचं दुकान तर पाहिलंच असेल. तुम्ही कधी चालतं-फिरतं दारुचं दुकान (Liquor Shop) पाहिलं आहे का? नाही ना. आम्ही तुम्हांला असं दुकान दाखवणार आहोत. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल. 


अनेक वेळा सोशल मीडियावर काही भन्नाट आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहून चकित व्हायला होतं, तर कधी हसू आवरणं कठीण होऊन बसतं. आता सोशल मीडियावर दारुच्या एका चालत्या-फिरत्या दुकानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घर शिफ्ट करणं तुम्हांला माहित असेल, तुम्ही पाहिलंही असेल. पण एका पठ्ठ्याने चक्क दारुचं दुकानंच शिफ्ट करण्याचं ठरवलं आणि तेही ट्रॅक्टरवरून.






 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रॅक्टरवर त्याचं दारुचं दुकान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना दिसत आहे. अचानक ट्रॅक्टरवर दारुचं दुकान घेऊन जाताना पाहून रस्त्यावरील इतर लोक चांगलेच चकीत झाले. हा व्यक्ती त्याचं दारुचं दुकानंच ट्रॅक्टरवरून घेऊ जाताना दिसत आहे. हे पाहून इतर व्यक्तींनी याचा व्हिडीओ चित्रित केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे.


देशी दारू आणि थंड बियर
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दारुच्या दुकानावर एका बाजूला 'ठेका शराब अंग्रेजी, देसी' म्हणजे देशीचे दारुचे दुकान आणि दुसऱ्या बाजूला 'फ्रिज में लगी ठंडी बीयर' म्हणज थंड बियरचं दुकान असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.


व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले
t1gerhr नावच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं, 'ऑल इंडिया डिलिव्हरी'.


महत्त्वाच्या इतर बातम्या