Trending Video : सध्याच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानानुसार (Technology) अनेक गोष्टी बदलत गेल्या आहेत. आणि आपण तंत्रज्ञानावर अवलंबून राहायला लागलो. पण, या जगात असेही काही लोक आहेत जे स्वत:च्या मेहनतीवर स्वत:ला सिद्ध करतायत. या ठिकाणी एका मुलाने स्वत:च्या मेहनतीने चक्क जेसीबी (JCB) बनवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या मुलाचे सोशल मीडियावर (Social Media) सर्वत्र खूप कौतुक होत आहे.
सध्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. हा व्हिडीओ पाहून या जगात कल्पक लोकांची काही कमतरता नाही याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. या व्हिडीओमध्ये एक मुलगा चक्क आपल्या कल्पकतेच्या (टॅलेंटच्या) जोरावर चक्क बुलडोझर बनवताना दिसत आहे.
पाहा हा व्हिडीओ :
पाहा मुलाची कलाकृती :
या ठिकाणी इंजीनियरिंग इनवेंशन या ट्विटर पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये हा मुलगा आपल्या हाताने लाकडापासून बनवलेला बुलडोझरचा वापर करताना दिसत आहे. यामध्ये अगदी सहजतेने तो एका ठिकाणची माती उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवताना तो दिसतोय. लाकडापासून हा बुलडोझर बनविण्यात आला आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल
लाकडापासून बनवल्यानंतरही बुलडोझरने जमीन खोदण्याचे काम अगदी सहजतेने करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर प्रत्येकजण या मुलाचे कौतुक करताना दिसच आहे. तसेच, हा मुलगा भविष्यातील मोठा इंजिनीअर होणार असे सांगत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मिडीयावर लहान मुलांच्या कलात्मकतेचे अनेक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरत होत असतात. या व्हिडीओला यूजर्सचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतो.
महत्वाच्या बातम्या :