Footbridge Collapse: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पुलाच्या उद्घाटनाचा आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी महापौर व इतर अधिकारी आले होते. यावेळी ते या पुलाचे उद्घाटन करतील इतक्यात तो तुटला आणि महापौरांसह सुमारे 24 हुन अधिक लोक नाल्यात पडले. या दुर्घटनेत महापौरांची पत्नी देखील नाल्यात पडली. 


ही घटना मेक्सिकोच्या कुर्निवाका येथील आहे. नदीवरील फूटब्रिजचे उद्घाटन शहराचे महापौर करत होते. लाकडी पाट्या आणि लोखंडी साखळ्यांनी बनवलेल्या या पुलाची पुन्हा बांधणी करण्यात आली होती. व्हिडीओ पाहून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, पुलाला जोडणाऱ्या लोखंडी सांखळीपासून पुलाचा जोडणारा दांडा वेगळा झाल्याने ही दुर्घटना घडली.






सिटी कौन्सिलचे सदस्य आणि इतर स्थानिक अधिकारी नाल्यातील दगडांवर 3 मीटर (10 फूट) खाली पडले. मोरेलोस राज्याचे गव्हर्नर Cuauhtémoc Blanco म्हणाले की, नाल्यात पडलेल्यांमध्ये महापौर, त्यांची पत्नी, अनेक अधिकारी आणि पत्रकार होते. अनेक जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एक वृत्तानुसार, महापौर José Luis Urióstegui यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते धोक्याबाहेर आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोक पुलावर चढल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या