Trending News : सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ युजर्सचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. कधी जंगली प्राण्यांच्या शिकारीचे, कधी भांडणांचे तर कधी पाळीव प्राण्यांचे गोंडस व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नुकताच एक पेंग्विनच्या (Penguin) समुहाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये पेंग्विन एका फुलपाखराचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडीओ







आतापर्यंत लाखो जणांनी पाहिलाय व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 3.2 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं मनोरंजन होताना पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सर्व पेंग्विन एका पांढऱ्या रंगाच्या फुलपाखराचा उड्या मारत पाठलाग करताना दिसत आहे. पेंग्विन हा पक्षी त्यांच्या शरीर यष्टी अर्थात त्याच्या गोंडस दिसण्यामुळे अनेकांच्या आवडीचा आहे. सर्व पेंग्विन उड्या मारताना फारच गोड दिसत आहेत.


हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. पण हा छोटासा व्हिडीओ पाहणं नेटिझन्सना खूप आवडलं आणि काही वापरकर्त्यांनी पेंग्विनचे ​​इतर मजेदार व्हिडीओही कमेंटबॉक्समध्ये शेअर केले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या