Viral Video: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक लोक सार्वजनिक वाहतूक (Public Transport) पर्यायांचा वापर करतात. कुठेही सहज पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक उत्तम पर्याय आहे. बरेच लोक हे रोजच्या प्रवासासाठी ट्रेन (Train) आणि बसचा (Bus) पर्याय अवलंबतात.


बहुतांश लोक जवळच्या अंतरासाठी बसचा (Bus) वापर करतात. पण तुम्हाला बसशी संबंधित एक रंजक गोष्ट माहित आहे का? खरं तर, तुम्ही कोणत्याही बसमधून प्रवास केलात तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल. ही गोष्ट म्हणजे बसच्या सीटचा रंग (Bus Seat Colour). तुम्ही कोणत्याही बसमध्ये गेलात आणि बसमधील सीटचा रंग पाहिला, तर तुम्हाला बस सीट नेहमी गडद रंगात दिसेल.


बसच्या सीट गडद रंगाच्या का असतात?


बसच्या सीटचा फक्त रंगच गडद नसतो, तर सीटच्या कव्हरवरील डिझाईन देखील अशा पद्धतीचे असतात ज्यामुळे सीट अजून गडद दिसते. पण यामागचं खरं कारण काय आहे याचा कधी विचार केला आहे का? नेमका का बरं बसच्या आसनांचा रंग नेहमी गडद असतो? फक्त रंगच गडद नाही, तर त्यावर ग्राफिक डिझाईन्स का बनवल्या जातात? हे काम सर्व बस कंपन्या मिळून करतात. याचं कारण जाणून घेऊया.


सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बसच्या सीटचा रंग गडद का असतो हे सांगितलं गेलं आहे. याचं उत्तर म्हणजे, बसची सीट गडद रंगाची असते कारण त्यामुळे त्यात साचलेली धूळ लपवता येते. व्हिडिओमध्ये बसच्या सीटवर ठोकल्यावर त्यातून धुळीचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. यावरून बसच्या सीट किती अस्वच्छ असतात, याचा अंदाज तुम्हाला येईल.






व्हिडिओ पाहून सर्वच आश्चर्यचकित


दररोज हजारो लोक बसने प्रवास करतात, अशा स्थितीत सीट खराब होणं स्वाभाविक आहे. जर बसच्या सीटचा रंग फिका असेल, तर त्यावर साचलेली घाण सहजपणे दिसून येईल. हे लक्षात घेऊन बसच्या आसनांना गडद रंग दिला जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला आहे. बसची सीट इतकी खराब कशी होऊ शकते, असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे.


हेही वाचा:


Facts: इकडे एक सांभाळता येईना, तिकडे दोन लग्नाची अट; 'या' देशात दोन लग्न करणं बंधनकारक, अन्यथा जन्मठेप