Two Marriages: जगभरातील विविध देशांच्या विविध परंपरा (Tradition) आहेत. तुम्ही देशादेशात गेलात, तर तेथील लोकांच्या भाषा वेगळ्या असतात. देश बदलला की वेश बदलतो, खाण्याच्या पद्धती बदलतात, जीवनशैली बदलते. जन्मापासून लग्नाचे ते अगदी अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्यासाठी विविध देशांत वेगवेगळे नियम असतात. अशात जगात एक देश असाही आहे, जिथे एक विचित्र परंपरा आहे. 


जगातील या देशात पुरुषांना दोन लग्न (Marriage) करणं बंधनकारक आहे, जर असं केलं नाही तर त्यांना शिक्षा देखील होऊ शकते. दुसरं लग्न करण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? तर हो, हे खरं आहे. या देशातील या विचित्र परंपरेबद्दल अधिक जाणून घेऊया.


सरकारने बनवला कायदा


आफ्रिकन देश इरिट्रिया येथे सर्व पुरुषांना दोन लग्न करण्याचा आदेश दिला जातो. असं न केल्यास त्यांना तुरुंगात देखील टाकलं जातं. यासाठी तेथील सरकारने एक कायदा देखील बनवला आहे. जर कुणी दुसऱ्या लग्नात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जन्मठेप देखील होऊ शकते. जर पहिल्या पत्नीने नवऱ्याला दुसरं लग्न करण्यास विरोध दर्शवला, तर तिला देखील शिक्षा होऊ शकते.


जबरदस्तीने ठरवलं जातं लग्न


इरिट्रिया या देशात हा विचित्र कायदा यासाठी बनवला गेला आहे, कारण तेथील पुरुषांची संख्या फार कमी आहे. महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. याच कारणामुळे या देशातील पुरुषांना दुसरं लग्न करण्यास भाग पाडलं जातं. इरिट्रियन सरकारच्या या निर्णयावर जगभरातून टीका देखील झाली. हा देश जगातील सर्वात कमी विकसित देशांपैकी एक आहे. या देशाचं मानवी हक्कांचं रँकिंग देखील खूप खालचं आहे.


आईसलँडमध्येही आहे विचित्र नियम


इरिट्रिया देशासारखेच इतर देशातही असे विविध विचित्र नियम आहेत. आईसलँडमध्येही मुलींना लग्नासाठी विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. आईसलँडमध्ये मुलींचं लग्न करण्याचं प्रमाण फारच कमी झालं होतं, त्यानंतर तेथील सरकारने मुलीशी लग्न करेल त्याला 3 लाख रुपये देऊ करण्याची योजना आणली. जर बाहेरच्या देशातील एखाद्या व्यक्तीने आईसलँडमध्ये राहणाऱ्या मुलीशी लग्न केल्यास त्याला नागरिकत्व देण्याची तरतूदही तेथील सरकारकडून करण्यात आली.


हेही वाचा:


Snake Farming: 'या' गावात केली जाते चक्क सापांची शेती; व्यवसायातून गावातील प्रत्येकजण श्रीमंत