Health Insurance: आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) घेण्याचं मुख्य कारण म्हणजे महागाईमुळे वाढलेल्या बिलांपासून स्वतःचं संरक्षण करणं. तरीही बहुधा असं होतं की, आपल्याकडे कॅशलेस हेल्थ कार्ड असलं तरी मेडिकल बिलाचा काही भाग आपल्याला भरावा लागतो. नेटवर्क हॉस्पिटलच्‍या सेवांचा लाभ घेतल्‍यानंतरही हॉस्पिटल बिलाचा काही खर्च पॉलिसीधारकाला सहन करावा लागतो. इतकंच नाही, तर अनेक वेळा आरोग्य विमा (Health Insurance) काढल्यानंतरही पॉलिसीधारकांना संपूर्ण बिल भरावं लागतं. अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? पाहूया.


या गोष्टी लक्षात ठेवा


असं बऱ्याचदा होतं, जेव्हा हेल्थ इन्शुरन्समध्ये करण्यात आलेले मेडिकल खर्चाचे दावे आरोग्य विमा योजनेच्या कव्हरेजचा भाग नसतात. असंही होऊ शकतं की, विमाधारकाने आवश्यक उपचारांसाठी केलेला वैद्यकीय खर्च विमा कंपनी अनावश्यक मानू शकते. तुम्ही हेल्थ इन्शुरन्स खरेदी करता तेव्हा त्या कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये सर्व नियम लिहिलेले असतात. विमा कंपन्या केवळ अशा खर्चाची भरपाई देते, जे विमाधारकाने घेतलेल्या पॉलिसी दस्तऐवजात कव्हरेज अंतर्गत नमूद करण्यात आले आहेत.


विमा खरेदी करताना काळजी घ्या


बर्‍याच आरोग्य विमा पॉलिसी सामान्यत: रुग्णालयात केल्या जाणाऱ्या आजारांच्या उपचाराचे पैसे कव्हर करत नाहीत. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकाला स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागतात. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना नेहमी त्यात उपलब्ध असलेल्या क्लेम बेनिफिट्सबद्दल नक्की वाचा. जर तुम्हाला विम्याबद्दल समजत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


जर तुम्हाला कोणताही तज्ज्ञ सापडला नाही, तर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला झालेल्या आजारांच्या कव्हरेजबद्दल नक्कीच माहिती करुन घ्या. अनेक वेळा एखादी व्यक्ती आजूबाजूच्या लोकांच्या संपर्कात येऊन आजारी पडते. विमा खरेदी करताना आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला आधीच कोणताही आजार असेल तर त्याबद्दल निश्चितपणे तपशीलवार माहिती मिळवा.


कुटुंबीयांचा आरोग्य विमा काढला?


तुम्ही कव्हर करण्यासाठी जे काही निवडता, त्याने थेट तुमच्या पॉलिसीचं मूल्य वाढेल. फॅमिली फ्लोटर घेतल्याचा अर्थ असा आहे की, तुमची विमा रक्कम तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी सामान्य कव्हरेज होईल. 4 लोकांच्या कुटुंबासाठी 2-3 लाख रुपयांचे मानक कव्हर पुरेसं असू शकत नाही. तसेच, ज्येष्ठ नागरिक कव्हरेज महाग असू शकतं, बहुतेक बेसिक प्लान  20 हजार रुपयांपेक्षा जास्तने सुरू होतात.


हेही वाचा:


NPS Scheme : निवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचीय? दररोज फक्त 'एवढी' रक्कम जमा करा आणि टेन्शन फ्री व्हा