पाटणा: बिहारमधील गोपालगंजमध्ये एका मामीने आपल्या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर यानंतर तिने पळून जाऊन भाचीशी लग्न देखील केले. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
गोपालगंजमध्ये एका मामीने आपल्या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण व्हायरल होत आहे. या दोघींमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मामी आणि भाचीने आपल्या नातेवाइकांचे न ऐकता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
लग्न का केले?
मंदिरात लग्नादरम्यान सर्व विधी पार पाडले. यावेळी दोघींनी एकमेकींना हार घातला, मंगळसूत्र घातले आणि मग सिंदूर लावून सात फेरे घेऊन सात जन्म सोबत राहण्याचे वचन दिले. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांसोबत शेवटपर्यंत राहण्याची शपथ घेतली. भाची शोभाच्या प्रेमात वेडी मामी सुमन म्हणाली की, शोभा खूप सुंदर आहे. तिचे दुसरीकडे लग्न झाले तर मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही मंदिरात लग्न केले. दोघींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबीयांना दिली. व्हिडीओमध्ये दोघींनीही त्यांच्या इच्छेनुसार लग्न करून एकत्र राहण्याबाबत सांगितलं आहे.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा-
गोपालगंजमध्ये मामी आणि भाचीचं लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे. सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत दोघांनी कुटुंबीयांना या लग्नाची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दोघंही बोलताना दिसत आहेत की, त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे आणि सातजन्म एकत्र राहण्याबद्दल सांगितलं आहे. मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
मामी-भाची लग्नानंतर काय म्हणाल्या?
संबंधित बातमी:
नवरा आणि प्रियकरानं रचला कट, 'दृश्यम' स्टाईल काढला काटा; नेमकं कसं उलगडलं महिलेच्या हत्येचं गूढ?