Viral Video : गेली काही दिवस सोशल मीडियावर (Social Media) कच्चा बदाम हे गाण चर्चेत होतं. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर व्हिडीओ तयार केले. पण आता नुकतच एक खास गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गण्यामध्ये एक व्यक्ती द्राक्ष विकताना दिसत आहे. द्राक्ष विकताना हा व्यक्ती एक खास गाणं म्हणतो. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 


कच्चा बदाम गाणं गाणारा भुवन बडायकरला यांना या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आता कोणतीही वस्तू विकताना गाण गायची ट्रिक अनेक लोक वापरताना दिसत आहेत. गेली काही दिवस सोशल मीडियावर कच्चा बदाम आणि  'कच्चा अमरूद'  ही दोन गाणी व्हायरल झाली होती. पण आता 'अंगूर साँग' देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती काळी द्राक्ष विकताना दिसत आहे. द्राक्ष विकताना हा व्यक्ती गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी आत्तापर्यंत पाहिला आहे. व्हिडीओमधील त्या व्यक्तीच्या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 






'कच्चा बदाम' ला मिळाली नेटकऱ्यांची पसंती
भुवन बडायकर यांचे कच्चा बदाम हे गाण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भुवन हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असं त्यांचे कुटुंब आहे. भुवन हे  कुरलजुरी गावामध्ये कच्चा बदाम म्हणजेच शेंगदाणे विकायचे. शेंगदाण्याला पश्चिम बंगालमध्ये 'कच्चा बदाम' म्हणतात.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha