World Most Precious Wood : चंदनाचं लाकूड सर्वात महाग लाकडांपैकी एक मानलं जातं. चंदन, लाल चंदन, साग अशा काही झाडांची लाकडं उत्तम प्रतीची असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते. महागड्या लाकडाचा विचार केला की, आपल्या मनात विचार येतो, तो म्हणजे चंदन. पण तुम्हाला माहित आहे का, चंदन हे सर्वात महागडं लाकूड नाही तर त्यापेक्षाही महाग एक लाकूड आहे. या एक किलो लाकडाच्या किमतीमध्ये तुम्ही आलिशान कार विकत घेऊ शकता. 


'हे' आहे जगातील सर्वात महागडं लाकूड


चंदन हे जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक आहे. साधारणपणे एक किलो चंदनाच्या लाकडाची किंमत सात ते आठ हजार रुपयेपर्यंत असते. पण चंदन हे सर्वात महागड लाकूड नाही. त्यापेक्षाही महाग एक लाकूड आहे, या एक किलो लाकडाची किंमत आठ हजार पौंड म्हणजेच सुमारे आठ लाख रुपये आहे.


एक किलो लाकडाची किंमत 8 लाख रुपये


जगातील सर्वात महागडं लाकूड म्हणजे आफ्रिकन ब्लॅकवूड. या लाकडाची किंमत 8 हजार पौंड म्हणजेच 7 ते 8 लाख रुपये प्रति किलो आहे. त्यामुळेचे हे लाकूड सर्वात महागडं लाकूड आहे. आफ्रिकन ब्लॅकवूड नावाप्रमाणे काळ्या रंगाचं असतं आणि आफ्रिकन भागात आढळतं, त्यामुळेच याला हे नाव देण्यात आलं आहे.


अत्यंत दुर्मिळ आहे 'हे' झाड


आफ्रिकन ब्लॅकवूड प्रकाराचं झाड जगातील दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळेच त्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. इतर झाडांच्या तुलनेत ही झाडे खूपच कमी प्रमाणात आहेत, त्यामुळेच त्यांना जास्त मागणी आहे. आफ्रिकन खंडाच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागात हे झाड दिसून येतं. यापैकी बहुतेक झाडे आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशात पूर्व सेनेगलपासून इरिट्रियापर्यंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर-पूर्व भागात आढळतात. हे झाड सरासरी 25 ते 40 फूट उंच वाढतं आणि जगातील 26 देशांमध्येच आढळतं. 


एक झाड वाढायला 60 वर्षे लागतात


डॅलबर्गिया मेलेनोक्सिलॉन (Dalbergia melanoxylon) नावाच्या झाडापासून आफ्रिकन ब्लॅकवूड लाकूड मिळतं. या झाडाच्या लाकडाच्या उच्च किंमतीचं एक कारण म्हणजे याची कमी संख्या. हे झाड जगातील दुर्मिळ झाडांपैकी एक आहे. हे एक झाड वाढण्यास सुमारे 60 वर्षे लागतात. यामुळेच या लाकडाचे दर जास्त आहेत. मर्यादित संख्या आणि मागणी जास्त असल्याने आता या लाकडाची अवैध तस्करीही होते.


कशासाठी वापरतात आफ्रिकन ब्लॅकवूड?


आफ्रिकन ब्लॅकवूड लाकडाचा वापर विशेष उत्पादनं बनवण्यासाठी केला जातो, त्यामुळे हे लाकूड अत्यंत महाग आहे. अहवालानुसार, अनेक आलिशान फर्निचर आणि काही खास वाद्यं म्हणजे बासरी आणि अनेक वाद्ये आफ्रिकन ब्लॅकवूडपासून बनवली जातात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mystery Train : गोष्ट एका रहस्यमयी ट्रेनची, बोगद्यात गेली अन् झाली गायब; 100 वर्षानंतरही सुरु आहे शोध