Groom Passed Out : लग्न (Marriage) म्हटलं की सात जन्माचं नातं असं म्हटलं जातं. आजकाल लोक आपलं लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. कुणी पाण्यात तर कुणी आकाशात लग्नगाठ बांधतात. पण काही लग्न मात्र विचित्र कारणांमुळे चर्चेत राहतात. अशीच एक घटना आसाममध्ये घडली आहे. नवरदेव चक्क लग्नमंडपात मद्यधुंद अवस्थेत पोहोचला. इतकंच नाही तर नरोबा मंडपातच झोपला. मग नवरीनं काय केलं जाणून घ्या...


दारुडा नवरा गुडघ्याला बाशिंग


आसाममध्ये नवरदेव दारू पिऊन लग्नमंडपात पोहोचला आणि त्याला तेथेच झोप लागली. नवरदेव तराट होऊन लग्नात पोहोचला. त्यानं इतकं मद्यपान केलं होतं की त्याला लग्नाचे विधी देखील पूर्ण करता आले नाही. दारुच्या नशेमुळे त्याला तेथेच झोप लागली. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रसेनजीत हलोई असं वराचं नाव असून तो नलबारी शहरातील रहिवासी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, नवरदेव लग्नातील विधी दरम्यान जमिनीवर झोपलेला दिसत आहे. 


तराट झालेला नवरदेव लग्नमंडपात झोपला


नवरदेव प्रसेनजीन हलोई लग्नमंडपात दारुच्या नशेत पोहोचला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, नवरदेव इतका नशेत आहे की, त्याला आपण काय करतोय याचीही शुद्ध नाही. एकीकडे भटजी लग्नाचे विधी करत आहेत, मंत्रोच्चारण सुरु आहे. तर दुसरीकडे नवरोबाचं याकडे अजिबात लक्ष नाही. एका बाजूला भटजींचे विधी सुरु असताना दुसऱ्या बाजूला नवरा शेजारी बसलेल्या माणसाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ :


या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वराला या अवस्थेत पाहून नवरी आणि तिचे कुटुंबिय चांगलेच आश्चर्यचकित झाले. वराला मद्यधुंद अवस्थेत पाहून वधूनं लग्नाला नकार दिला आहे. मद्यपी नवरदेवामुळे नवरीनं भरमंडपात लग्न मोडलं. नवरी लग्नाला नकार दिला.


नवरीच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत फिर्याद दाखल


दरम्यान, या घटनेनंतर नवरीच्या कुटुंबीयांनी नलबारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून लग्नासाठी नुकसान भरपाईची मागणी केली. वराच्या बाजूचे अनेक जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबातील एका सदस्याने आरोप केला की, "लग्न छान चाललं होतं. आम्ही सर्व विधी पूर्ण केलं. वराला गाडीतून नीट उतरताही आलं नाही. त्याचे वडील तर त्याच्याहूनही नशेत होते."


नवरीकडील मंडळीची प्रतिक्रिया काय?


लग्नाचे विधी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं नवरीच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, आम्ही नवरदेव आणि त्यांच्याकडील मंडळींना विनंती करण्याचा प्रयत्न केला पण 95 टक्के वऱ्हाडी मद्यधुंद अवस्थेत होते. यानंतर जेव्हा वातावरण बिघडलं तेव्हा नवरीनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांत तक्रार केली.