Sonu Sood : कोरोना काळात ‘मसीहा’ बनून लोकांची सेवा करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच चर्चेत असतो. कुणालाही कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी अभिनेता नेहमीच तयार असतो. सोशल मीडियाद्वारे मदत मागणाऱ्यांच्या हाकेला अभिनेता लगेच धावून जातो. आता देखील अशाच एका कारणामुळे तो चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील (Jharkhand) एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुकल्या मुलाने आपल्या शाळेची झालेली दूरावस्था दाखवली आहे. विशेष म्हणजे या मुलाने एखाद्या रिपोर्टरने माहिती द्यावी, अशा प्रकारे हा व्हिडीओ बनवला आहे. त्याचा हा व्हिडीओ आणि शिकण्याची जिद्द पाहून अभिनेता सोनू सूदने त्याला मदतीचा हात दिला आहे.


हातात काठी आणि त्यावर प्लास्टिकची बाटली लावून, त्याचा माईक बनवून आपल्याच शाळेमध्ये रिपोर्टिंग करणारा अवघ्या 12 वर्षांचा हा चिमुकला सरफराज (Sarfaraj) त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत (Viral Video) आला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.


पाहा व्हिडीओ :



झारखंडमधील (Jharkhand) भिखियाचक या गावात रहाणाऱ्या सरफराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सरफराजने आपल्या प्राथमिक शाळेची दुर्दशा एका रिपोर्टरच्या स्टाईलमध्ये सांगितली आहे. तसेच, शाळेतील अस्वच्छता दाखवण्यापासून ते शाळेच्या जीर्ण इमारतीपर्यंत त्याने गोष्टींबद्दल आपल्या व्हिडीओत सांगितले आहे. इतकंच नाही, तर सरफराजने व्हिडीओमध्ये शाळेतील शिक्षकांच्या निष्काळजीपणा देखील दाखवला आहे. शिक्षक शाळेत हजेरी लावून परत घरी जातात, असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.


सोनू सूद करणार सरफराजची मदत


सरफराजचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सरफराजच्या व्हिडीओची दखल आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने घेतली आहे. आता सोनू सूदने या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे ठरवले आहे. सरफराजचा हा व्हिडीओ शेअर करत सोनू सूदने म्हटले की, ‘आता पुढची रिपोर्टिंग तू नव्या शाळेतून कर. सामान आवर, नवी शाळा आणि हॉस्टेल तुझी वाट बघत आहेत.’




बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न तो करतो. अनेक गरजू लोक सोशल मीडियाद्वारे अभिनेता सोनू सूदला टॅग करून मदतीचे आवाहन करताना दिसतात. 


संबंधित बातम्या 


Sonu Sood Birthday: खिशात 5000 रूपये घेऊन आला होता मुंबईत, आज कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूदबाबत


Sonu Sood : कोरोनाकाळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सोनू सूदचा 'आयएए विशेष पुरस्कारा'ने सन्मान