Sonu Sood : कोरोनाकाळात गरजू लोकांना मदत करण्याचं काम अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केलं. कोरोनाकाळात सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रद्रेश, पश्मिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत होते. अनेक मंडळींसोबत सोशल मीडियाद्वारे संवाद साधत होता. त्यामुळे आता सोनू सूदला 'आयएए विशेष पुरस्कारा'ने (IAA awards 2022) गौरवण्यात आलं आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना अभिनेता सोनू सूद स्वखर्चाने आपापल्या गावी पोहोचवत होता. अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम सोनू सूद करत होता. सोनू सूदच्या या कार्याची दखल घेत त्याला 'आयएए विशेष पुरस्कारा'ने गौरवण्यात आले आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
रणवीरला मिळाला 'ब्रँड एंडॉर्सर ऑफ द इयर' पुरस्कार
भारतीय मार्केटिंग, जाहीरात आणि मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 'आयएए' लीडरशीप पुरस्काराने गौरवलं जातं. त्यानुसार रणवीरला 'ब्रँड एंडॉर्सर ऑफ द इयर' (Brand Endorser of the Year) या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रणवीर सध्या 41 ब्रॅंड्सचं प्रतिनिधित्व करत आहे.
अविनाश पांडे यांना मिळाला 'मीडिया पर्सन ऑफ द ईअर' पुरस्कार
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सोहळ्यात एबीपी नेटवर्कनं बाजी मारली आहे. एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांना मीडिया पर्सन ऑफ द ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आयएए (International advertisg association) तर्फे अविनाश पांडे यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
अविनाश पांडे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर एबीपी नेटवर्कचे आभार मानले. अविनाश पांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, "हा पुरस्कार एबीपी नेटवर्कच्या सर्वोत्तमतेवर मोहोर उमटवणारा पुरस्कार आहे. याचा मला अभिमान आहे".
संबंधित बातम्या