Optical Illusion Image : 'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) हा आता अगदी सामान्य शब्द झाला आहे. जे लोक सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतात त्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नेमकं काय हे माहीत असतं. आणि त्यांना सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक चित्रदेखील पाहायला मिळतात. वास्तविक पाहता, ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. आपण जे पाहतो ते प्रत्यक्षात नसतं आणि जे घडतं ते सहजासहजी दिसत नाही.


सोशल मीडियावर सध्या असेच ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ बघून क्षणभर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या ठिकाणी या फोटोमध्ये जो प्राणी (कुत्रा) (Dog) आहे त्यात एक मानवी चेहरा लपलेला आहे. 


आजकाल अशाच एका ऑप्टिकल इल्युजन फोटोने लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला आहे. हा व्हायरल फोटो पाहून अनेकजण संभ्रमात पडले आहेत. संबंधित फोटोत मानवी चेहरा कुठे दिसतो ते शोधा. 


संभ्रमात पडलात?


ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात कुत्र्याचे स्केच तयार करण्यात आले असून या स्केचमध्ये मानवी चेहरा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे चित्र 1880 च्या दशकातील आहे. मात्र, या फोटोतील मानवी चेहरा शोधताना अनेकांना घाम फुटला आहे. 



  


'या' ठिकाणी लपला आहे मानवी चेहरा : 


संबंधित चित्र जर तुम्ही अगदी बारकाईने पाहिले असेल तर तुम्हाला या चित्रात तो मानवी चेहरा दिसेल. या चित्रात कुत्र्याच्या कानाजवळ हा मानवी चेहरा लपलेला दिसतोय. खरंतर, ऑप्टिकल इल्युजन हे फार सोपे असते. फक्त यामध्ये एकाग्रता असणे फार महत्वाचे आहे. सध्या सोशल मीडियावर हे चित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.     


महत्वाच्या बातम्या :