Traffic Rules of World: भारतात रस्त्यावर गाडी चालवत असताना अनेक नियम (Traffic Rules) पाळावे लागतात. जसं की, कधी वेगावर नियंत्रण ठेवावं लागतं, कार (Car) चालवताना सीटबेल्ट (Seatbelt) वापरावं लागतं, बाईक (Bike) चालवताना हेल्मेट (Helmet) वापरावं लागतं, असे आणखी बरेच नियम आहेत. जर आपण हे नियम मोडले तर ट्राफिक पोलीस (Traffic Police) आपल्याला दंड देखील ठोठावतात, तर कधी कधी सीसीटीव्ही द्वारे ऑनलाईन चलान कापलं जातं. हे सगळं तर झालं भारतातील वाहतूक नियमांबद्दल. पण जगातही वाहतुकीचे वेगळे आणि विचित्र नियम आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? अशाच काही अजब प्रकारांबदद्ल जाणून घेऊया.


भर रस्त्यात गाडीचं पेट्रोल संपल्यास आकारला जातो दंड


जर्मनीमध्ये तुम्ही हायवेवर हव्या तितक्या वेगाने गाडी चालवू शकता. तुम्हाला त्यातून सूट देण्यात आली आहे, अतिवेगाने गाडी चालवल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. परंतु जर तुमच्या गाडीचं इंधन रस्त्याच्या मध्येच संपलं, तर मात्र काही खरं नाही.


जर्मनीमध्ये भर रस्त्यात गाडीचं पेट्रोल संपल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते किंवा तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. हेच भारतात जर तुमच्या सोबत असं काही घडलं, तुमच्या गाडीचं पेट्रोल मध्येच संपलं आणि आजूबाजूला मदत करायला कोणी नसेल, तर कधी कधी पोलीस स्वत: तुम्हाला मदत करतात. जवळच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणून गाडीत टाकून देतात.


रशियातही आहेत वेगळेच नियम


जर तुम्ही रशियाच्या रस्त्यावर गाडी चालवत असाल आणि तुमची कार धुळीने भरली असेल तर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आहात, हे समजून घ्या. यासाठी तुम्हाला तिथे दंड भरावा लागू शकतो. नियमानुसार, वाहनावर वाहन क्रमांक स्पष्टपणे दिसणं बंधनकारक आहे, त्यामुळे तेथील लोक स्वच्छ कार चालवण्यास प्राधान्य देतात.


जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये राहत असाल आणि वीकेंडला तुमची कार धुवायची असेल, तर तुम्ही तसं करू शकत नाही. स्वित्झर्लंडमध्ये रविवारी गाड्या धुण्यास बंदी आहे. जर कोणी असं केलं तर त्याला दंड भरावा लागतो. जपानमध्ये पावसात गाडी चालवताना कोणाच्याही अंगावर पाणी उडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.


हेही वाचा:


पेट्रोल गरम केलं तर काय होईल? गॅस पेटवताच आग लागेल का? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI