पालघर :  काही वेळेस एखादा कर्मचारी आपल्याऐवजी इतर कर्मचाऱ्याला ड्युटीवर पाठवत असल्याचा प्रकार घडतो. अशी काही प्रकरणे आपल्यासमोर आलीत. असाच एक धक्कादायक प्रकार पालघर रेल्वे स्थानकात समोर आला आहे. पालघर रेल्वे स्थानकातील (Palghar Railway Station) तिकीट घरामध्ये सुरू असलेल्या कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यासाठी नेमलेल्या महिला अधिकाऱ्याऐवजी चक्क त्यांच्या पतीने हे काम करण्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठांनी पालघर स्टेशन व्यवस्थापकांना तोतया कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सूचना केल्या. रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, सहा तास उलटल्यानंतर देखील रेल्वे पोलीस अथवा रेल्वे सुरक्षा दलात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


पालघर रेल्वे स्थानकात असलेल्या सेंट्रल बुकिंग कार्यालयात सकाळी नऊ वाजता आपण ऑडिटर असल्याचे सांगत एका इसमाने कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती घेतली. त्यांच्या एकंदर वर्तवणुकीवरून संशय आल्याने पालघरमधील वाणिज्य निरीक्षकांनी याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली. त्यानंतर लेखापरीक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती महिला असून त्याच्या ऐवजी तिचे पती काम करत असल्याचे उघड झाले. 


या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालघरच्या स्टेशन व्यवस्थापकाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही घटना समजल्यानंतर संबंधित महिला अधिकारी यांनी पालघर रेल्वे स्थानक गाठून हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. पालघरच्या आरपीएफ कार्यालयामध्ये या तोतया कर्मचाऱ्याला ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित करून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, रेल्वे पोलीस जीआरपी यांनी आपल्याकडे सदरचा इसमाबाबत तक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही असे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात सहा तास उलटल्यानंतर देखील कोणतीही फिर्याद नोंदवण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. संबंधिताविरुद्ध फिर्याद दाखल झाल्यानंतर तपशील जारी केला जाईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.


ब्लॅकमेलिंगच्या धमक्या सहन होईना, बापलेकानं एकाच रुममध्ये जीवन संपवलं


ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना कंटाळून बापलेकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत जमिनीच्या वादातून झालेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बाप लेकाने राहत्या घरात एकाच रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. ऍडविन डिसोझा (वय 59) आणि कुणाल डिसोझा ( वय 27) असे आत्महत्या केलेल्या बापलेकाचे नाव आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :