Petrol Heated video: पेट्रोल एखाद्या ठिकाणी ठेवलं असेल आणि त्यात थोडीशी आगीची ठिणगी जरी पडली तरी भडका उडतो आणि काही सेकंदांत मोठी आग लागते. यामुळेच पेट्रोल (Petrol) नेहमी आगीपासून दूर ठेवावं, असं सांगितले जातं, कारण पेट्रोल आगीच्या संपर्कात आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर एखाद्या भांड्यात पेट्रोल ठेवलं आणि गरम केलं तर काय होईल? म्हणजेच पेट्रोल गॅसवर ठेऊन तापवलं तर काय होईल? पेट्रोल गरम होताच पेटेल की पाण्यासारखं उकळू लागेल? पेट्रोल गरम झाल्यावर नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का?


पेट्रोल गरम केल्यास काय होईल?


सर्वात आधी, एखाद्या गोष्टीला आग कधी आग लागते हे जाणून घेऊया. कुठल्‍याही गोष्टीला आग दोन प्रकारे लागते. प्रथम, जेव्हा एखादी वस्तू थेट आगीच्या संपर्कात येते, तेव्हा आग लागते. जसं की, एखाद्याने सिगारेट ओढून शेवटची जळती खाली टाकली, त्याची ठिणगी गवत किंवा कागदाच्या संपर्कात आली तर आग लागते. आणि दुसरं म्हणजे, कोणत्याही कोरड्या वस्तूवर जास्त सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्याला आग लागते.


पेट्रोलच्या बाबतीतही असंच घडतं. जेव्हा पेट्रोल आग किंवा ठिणगीच्या संपर्कात येते तेव्हा त्याला आग लागते. याशिवाय जर पेट्रोलचं तापमान 280 अंशांपेक्षा जास्त असेल तर त्याला आग लागू शकते. पण गॅसवर ठेवून पेट्रोल गरम केल्यावर काहीही परिणाम होत नाही आणि पेट्रोलला आग देखील लागत नाही.


पेट्रोल गरम केल्यास आग लागत नाही


पेट्रोल वाफेत बदलू लागतं. काही वेळाने पेट्रोल उकळू लागेल पण त्याला आग लागणार नाही. पेट्रोल गरम केल्यावर आग लागत नाही आणि हळूहळू पेट्रोलचं बाष्पीभवन होतं. जर तुम्ही एका भांड्यात एक लिटर पेट्रोल गरम केलं तर ते काही वेळात हळूहळू कमी होईल.


बाष्पीभवन होईल, पण आग लागणार नाही


याबाबतची चाचणी अनेक यूट्यूब चॅनलवरही करण्यात आली आहे, ज्यामध्ये पेट्रोल गरम झाल्यावर काय होतं? हे दाखवणारा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. या व्हिडिओंमध्ये असंही दिसून आलं की, पेट्रोल गरम केल्यावर त्याचं बाष्पीभवन होतं, परंतु त्याला आग लागत नाही.


हेही वाचा:


VIDEO: मुंबई लोकलमध्ये महिलांची 'दे दणादण'; एकमेकींचे केस खेचत धावत्या ट्रेनमध्ये तुफान राडा


Car loan Information:

Calculate Car Loan EMI