Nandurbar: राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या आठवड्याभरापासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवापूर (Navapur) तालुक्यातही दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. परिसरातील नदी नाल्यांनाही पुर आला आहे. त्यामुळे नागपूर-सुरत (Nagpur - Surat) राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक पूर्णत बंद झाली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. तसेच पिंपळनेर ते चरणमाळमार्गे जाणारा रस्ता देखील बंद झाला आहे. साक्री ते पिंपळनेर मार्गावरील कान नदीला पूर आल्याने पूलावरील वाहतुक बंद झाली आहे. प्रशासनातर्फे महामार्गावरील वाहतुक उच्छल-दहिवेल-नंदुरबार मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता उपाययोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


धरणातून विसर्ग झाल्यास महापुराची भिती


नवापूर तालुक्यातील खोकसा धरण भरले आहे. रंगावली धरणातल्यी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास रंगावली नदीला रात्रीच्या दरम्यान महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात पालिका व महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. नदी काठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह इदगाह रोड, सार्वजनिक हॉल / शासकीय विश्रामगृह, या ठिकाणी स्थलांतरित व्हावे तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.


Maharashtra Mumbai Rain : मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा


सुरत-भुसावळ पॅसेंजरगाड्याची गती मंदावली


सरपणी नदीला पूर आल्याने या पूराच्या पाण्याखाली नवापूर तालुक्यातील कोळदा येथील रेल्वेस्थानकाचा रेल्वे रुळ गेला आहे. कोळदे रेल्वेस्थानक परिसर जलमय झाला असून रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली असल्याने सुरत-भुसावळ या लोहमार्गावरुन मार्गस्थ होणार्‍या पॅसेंजर रेल्वे गाड्यांसह सर्वच गाड्या हळुवारपणे मार्गस्थ होत आहे.


Mumbai Rain Updates : मुंबईत दर्याला उधाण; समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी; महापालिकेच्या सूचना


जिल्हाधिकार्‍यांसह तहसिलदारांकडून पाहणी


नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ असलेल्या पर्यायी कच्चापूल सरपणी नदीला आलेल्या पूराच्या पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. महामार्गावरील ठप्प झालेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी संबंधीत विभागास जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. तसेच नदी-नाल्यांच्या ठिकाणी सेल्फी किेंवा फोटोग्राफी काढू नये. मासेमारी करण्यासाठी कोणी जावू नये असे आवाहन तहसिलदारांनी केले आहे.


Wardha Rain Updates : वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन