Guru Purnima 2022 : हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व असले, तरी आषाढ महिन्याची पौर्णिमा खूप खास असते. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला गुरूची पूजा करण्याचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिवशी गुरूची पूजा केल्याने कुंडलीतील गुरु दोष दूर होतात असे मानले जाते. पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी येत आहे. या दिवशी 3 प्रमुख ग्रह एकाच राशीत बसतील.


3 प्रमुख ग्रह एकाच राशीत


या दिवशी 3 प्रमुख ग्रह एकाच राशीत येणार आहेत. पंचांगानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह मिथुन राशीत बसतील. 3 ग्रह एकाच राशीत असताना त्रिग्रही योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तिन्ही योग अत्यंत शुभ आहे. या अद्भुत संयोगाचा काही राशींवर खूप शुभ प्रभाव पडेल. या राशींना भरपूर पैसा मिळेल.


मिथुन : या काळात मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. संपत्तीत वाढ होईल. खर्चाला आळा बसेल. बचत वाढेल. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील.


धनु : धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते. त्यांचा बॉस त्यांच्या कामावर खूप खूश असेल. जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. ज्या लोकांना मालमत्तेत गुंतवणूक करायची आहे. त्यांच्यासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या राशीचे लोक इमारत किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात.


तूळ : या लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. त्यांना चांगली बातमी मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या: