ENG vs IND ODI Series:  लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानावर भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून (12 जुलै 2022) सुरुवात होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखन धवनचं (Shikhar Dhawan) भारतीय संघात पुनरागमन झालंय. इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच शिखर धवन विशेष पंक्तीत स्थान मिळवणार आहे.


शिखन धवननं आतापर्यंत 149 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर, इंग्लंडविरुद्ध आज खेळला जाणारा पहिला एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील 150 एकदिवसीय सामना असेल.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखर धवन दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या कालावधीत त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. शिखरनं 149 एकदिवसीय सामन्यात 45.54 च्या सरासरीनं 6 हजार 284 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 शतक आणि 35 अर्धशतकांची नोंद आहे. 


शिखर धवनची कामगिरी
विश्वचषक किंवा आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये शिखर धवन दमदार फलंदाजी केली आहे. दरम्यान, 2013 आणि 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारतासाठी त्यानं सर्वाधिक धावा केल्या होत्या. याशिवाय, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये 2015 खेळल्या गेलेल्या विश्वचषकातही त्यानं चमकदाक कामगिरी केली होती. या विश्वचषकातही त्यानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.  श्रीलंका दौऱ्यावर शिखन धवननं एकदिवसीय संघांचं नेतृत्व केलं होतं. आयपीएलनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतही त्याची संघात निवड झाली नव्हती. मात्र, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. 


हे देखील वाचा-