एक्स्प्लोर
नवी मुंबईकरांनो आज प्रवास टाळा, हार्बर, ट्रान्सहार्बरवर आज मेगाब्लॉक
कारण, आज मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

फाईल फोटो
मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आजचा रविवार अडचणीचा ठरणार आहे. कारण, आज मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील पनवेल ते मानखुर्द दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या काळात हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहिल. त्यामुळे नवी मुंबईकरांना आज मुंबईत पोहोचण्यासाठी बस, किंवा इतर वाहनांचा वापर करावा लागणार आहे. मध्य मार्गावरही कल्याण ते ठाणे दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात स्लो मार्गावरची वाहतूक फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे.या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकात थांबणार नाहीत.
Before You Go
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
व्यापार-उद्योग
विश्व






















