नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उद्या, गुरुवारी नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्हा दौऱ्यांवर येत आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सकाळी सव्वाअकरा वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. स्थानिक प्रशासनाकडून स्वागताचा स्वीकार करुन ते सकाळी साडेअकरा वाजता शासकीय विमानाने अकोल्याकडे प्रयाण करतील.


अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता ते शेगाव (जि. बुलडाणा)कडे प्रयाण करतील. शेगाव येथील गजानन महाराज मंदिराला दुपारी 4 वाजता ते भेट देतील. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता शासकीय वाहनाने ते अकोल्याकडे प्रयाण करतील. अकोला येथून सायंकाळी सव्वापाच वाजता कोश्यारी विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील. राजभवन येथे त्यांची सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेसात वाजेपर्यंत वेळ राखीव राहणार असून रात्री आठ वाजता नागपूर येथून विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.


इतर महत्वाच्या बातम्या


GST Council : अन्नधान्य आणि डेअरी उत्पादनं महागणार, 18 जुलैपासून पाच टक्के जीएसटी लागणार


Nagpur News : वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस; जिल्हा कृती दल व मिशन वात्सल्य समितीचा आढावा