उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) राजरोसपणे डान्स बार (Dance Bar) आणि जुगाराचे अड्डे सुरु असल्याचं चित्र सध्या आहे. याच डान्स बारविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाला डान्स बार चालकांनी मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. हा तरुण एका सामाजिक कार्यकर्त्याचा मित्र असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. याविरोधात या तरुणाने विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदवली आहे. तर पोलिसांनी देखील यावेळी तक्रार दाखल न करता फक्त एनसी नोंदवून घेतली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 


नेमकं काय घडलं?


उल्हासनगरमध्ये सुरु असलेल्या डान्स बारविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. दरम्यान ज्या तरुणाला यामध्ये मारहाण झाली त्यांचं नाव मनीष सोनावणे असं आहे. या तरुणाने 9 मार्च 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे धरण आंदोलन सुरु केलं आहे. हे आंदोलन डान्स बारचा वाढता आलेख या विरोधात होतं. मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र अद्यापही सरकाने या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर पोलीस देखील फक्त दाखवण्यापूर्ती कारवाई करुन आरोपींना सोडून देतात, असा दावा देखील केला जात आहे. 


याच संदर्भात चर्चा करण्यासाठी एका डान्स बारच्या मालकाने शेरु गंगावणे यांना भेटायला बोलावले होते. आझाद मैदानावर सुरु असलेलं धरणे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात देखील डान्स बार मालक शेरु यांच्याशी चर्चा करणार होते. त्याप्रमाणे शेरु गंगावणे हे त्यांचा मित्र मनीष सोनावणे यांच्या गाडीतून बारपर्यंत गेले. ते काही वेळ तिथेच बोलत उभे होते. तेव्हाच डान्स बारचे मालक तिथे आले आणि त्यांनी मनीष यांना विचारणा केली. 


"तू शेरु गंगावणे यांची मदत का केली तो आमचे डान्स बार बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे," असं डान्स बार मालकांनी मनीष यांना विचारलं. तसेच तू त्याला मदत नको करु असं म्हणत डान्स बार मालकाने मनीष यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तर पोलीस या संदर्भात काही कारवाई करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पण पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून घेतली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहे. 


हेही वाचा : 


Nandu Nanavare Case: नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग; भावाने बोट कापल्यानंतर अटकसत्र सुरू, माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकरही गोत्यात?